Supreme Court issues notices to the Centre and Election Commission over demands for major changes in the Anti-Defection Law. saam tv
देश विदेश

पक्ष बदलणाऱ्या MLA-MP ला बसणार मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस; राजकीय वर्तुळात खळबळ

Anti-Defection Law : पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. राजकीय पक्षांतर रोखण्यासाठी केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Bharat Jadhav

  • पक्षांतरबंदी कायद्यात बदल करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

  • पक्ष बदलणाऱ्या आमदार खासदारांना बसणार मोठा धक्का

  • पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी

एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या लोक प्रतिनिधींचं टेन्शन वाढणार आहे. पक्षांतर करणाऱ्या आमदार-खासदारांच्या राजकीय उलथापालथ होण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी नवा कायदा येण्याची शक्यता आहे. पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला आपली भूमिका मांडण्याचे निर्देश दिलेत.

पक्षांतरबंदी कायद्यात बदल करण्याच्या मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ए. सेथू यांनी ही याचिका दाखल केलीय. याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने आर. सतीश कुमार आणि जतीन यांनी बाजू मांडली.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या जनहित याचिकेवर सुनावणी झाली असून न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावलीय. तसेच या कायद्यातील बदलांच्या मागणीवर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत.

अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी राजीनाम्याचा वापर?

याचिकेत आमदार आणि खासदारांकडून पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत होणारी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी राजीनाम्याचा वापर केला जातो. हा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीविरोधात पक्षांतराची तक्रार दाखल झाल्यानंतर किंवा अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधी विधानसभा अध्यक्ष किंवा सभापतींकडील निर्णयाआधीच राजीनामा देतात. त्यानंतर ते दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करून पुन्हा निवडणूक लढवू शकतात. या प्रक्रियेमुळे पक्षांतरबंदी कायद्याचा मूळ उद्देशच निष्प्रभ ठरू शकतो, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आलाय.

राजीनामा दिला तरी अपात्रतेची कारवाई थांबू नये

अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना दिलेला राजीनामा म्हणजे अपात्रतेची प्रक्रिया आपोआप संपुष्टात येऊ नये. राजीनामा स्वेच्छेने आणि खरोखरच दिला आहे की राजकीय दबाव किंवा फायद्यासाठी दिला आहे, याची तपासणी व्हावी. राजीनामा आणि अपात्रतेच्या याचिकांवर निश्चित कालमर्यादेत निर्णय घेण्याची व्यवस्था असली पाहिजे. विधानसभा अध्यक्ष किंवा सभापतींकडे असलेल्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेचे संस्थात्मक पुनरावलोकन व्हावे. त्रिशंकू विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया केवळ विधिवत स्थापन झालेल्या सभागृहातच व्हावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उल्हासनगरात रिजेन्सी कॉम्प्लेक्सवर महापालिकेचा हातोडा

Political News : ठाकरे सेनेत पुन्हा फूट पडणार, शिंदे गटातील आमदाराच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Trisha Krishnan Politics: मुख्यमंत्री विजय यांच्यानंतर आता त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? जयललितांशी होतेय तुलना!

Vehicle Insurance : वाहन विम्याचे होणार ४ भाग! १५ डिसेंबरपासून नवा नियम लागू; वाहनमालकांसाठी काय बदलणार?

राजकारणात मोठा भूकंप! 3 आमदार राजीनामा देणार?

SCROLL FOR NEXT