Supreme Court of India latest hearing 
देश विदेश

खोट्या तक्रारी करणाऱ्यांना शिक्षा होणार; सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारे, मानवाधिकार आयोगाला नोटीस

Supreme Court notice : आता खोट्या तक्रार करणाऱ्यांना शिक्षा होणार आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकार आणि मानवाधिकार आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे.

Vishal Gangurde

सुप्रीम कोर्टाकडून केंद्र, राज्य सरकार आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला नोटीस जारी

खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

भारतीय न्याय संहितेत खोट्या तक्रारीसाठी दंडाची तरतूद

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला नोटीस जारी केली आहे. वकील अश्विनी उपाध्याय यांनी जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेनंतर पोलीस स्टेशन आणि इतर सार्वजनिक संस्थेत खोटी तक्रार केली असल्यास केंद्र आणि सरकारला खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर शिक्षा करण्याच निर्देश दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने आदेश देताना स्पष्ट केलं आहे की, जनहित याचिकेचा उद्देश हा खोट्या गुन्ह्यात अडकणाऱ्या निर्दोष लोकांच्या रक्षणासाठी आहे. भारतीय न्याय संहितेत खोट्या तक्रारदारांच्या विरोधात दंडाची शिक्षा तरतूद आहे. आधी भारतीय दंड संहितेत ही तरतूद नव्हती. याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे की,'जर तक्रारकर्त्याने खोटे विधान आणि आरोप केले, त्याने केलेली तक्रार खोटी ठरली. तर तक्रारकर्त्याला दंड व्हावा'.

तत्पूर्वी, सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी NCERT चे कान टोचले. इयत्ता आठवीच्या पुस्तकात न्यायपालिकेबाबत 'भ्रष्ट न्यायव्यवस्था' नावाचा धडा समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणाची स्वत:मुख्य सरन्यायाधीशांनी दखल घेऊन सुनावणी घेतली. यावेळी त्यांनी NCERT वर टीका केली.

खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, NCERTने न्यायपालिकेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता.त्याला परवानगी देता येणार नाही. पुस्तकात असा धडा समाविष्ट करण्यात आला, याबाबत स्पष्टीकरण मागवण्यासाठी खंडपीठाने कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. तसेच NCERT ची ही कृती न्यायालयाचा अवमान मानली आहे. त्यानंतर त्यांना अवमान नोटीसही बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, २ दुचाकीची समोरासमोर धडक; ३ भावांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update : धुळे–सुरत महामार्गावर मोठी दुर्घटना; गॅस टँकरला भीषण आग

Evening Breakfast: संध्याकाळी नाश्त्याला खा 5 कुरकुरीत पदार्थ

Dombivli : डोंबिवलीतील 'त्या' विद्यार्थिनीच्या खात्यात २ कोटी ६० हजार; उल्हासनगर ते उत्तराखंड कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा; कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने निवड

SCROLL FOR NEXT