Court Saam Tv
देश विदेश

SC: संताेष परब हल्ला प्रकरणातील जामीन अर्जावर न्यायालयाने नाेंदवले गंभीर निरीक्षण

आज सर्वाेच्च न्यायालयात गाेट्या सावंत यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : संताेष परब (santosh parab) हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) यांच्या समवेत सह आराेपी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गाेट्या सावंत (gotya sawant) यांनी जामीनासाठी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर दूसरीकडे आज नितेश राणेंच्या (nitesh rane) जामीन अर्जावर सिंधूदुर्गात (sindhudurg court) दुपारी सुनावणी सुरु हाेणार आहे. (nitesh rane latest marathi news)

नितेश राणे (nitesh rane) यांनी सर्वाेच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्जासाठी धाव घेतल्यानंतर सरन्यायाधीश एन व्ही रमणा (CJI NV Ramana) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नितेश राणे यांना ट्रायल कोर्टासमोर आत्मसमर्पण करण्यास आणि नियमित जामीन घेण्यास सांगितले हाेते. त्यानूसार राणेंनी कार्यवाही केली. आज सिंधूदुर्गातील जिल्हा व सत्र न्यायालयात राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी हाेत आहे.

दरम्यान संताेष परब हल्ला (santosh parab) प्रकरणात नितेश राणेंसमवेत सहआराेपी असलेले संदेश उर्फ गाेट्या सावंत (gotya sawant) यांनी मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) अटकपुर्व जामीन नाकारल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयात (supreme court) जामीनासाठी अर्ज केला हाेता. दरम्यान सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी सर्वोच्च न्यायालय केवळ अटकपूर्व जामीन अर्जांच्या सुनावणी करण्यासाठी बनले आहे असे निरीक्षण नाेंदवले. भाजप नेते नितेश राणे यांच्यासह सहआरोपी असलेल्या गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज तातडीने बाेर्डवर घ्यावा यासाठी तयार करण्याच्या यादीवरुन खंडपीठाने नाराजी व्यक्त केल्याचे जाणकार सांगतात.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

World Diabetes Day 2024: कमी वयातील व्यक्तींना का होतोय Diabetes? तज्ज्ञांनी स्पष्ट केली कारणं आणि उपाय

Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप, गुन्हा दाखल

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

SCROLL FOR NEXT