Live-in relationship saam tv
देश विदेश

Live-in relationship: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; आता 'या' महत्त्वाच्या कायद्याचं संरक्षणही मिळणार

सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत लग्नाचा स्पष्ट हेतू असलेल्या लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलांनाही कलम 498A अंतर्गत संरक्षण मिळू शकतं, असं स्पष्ट केलं. अटक प्रक्रियेबाबतही न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले असून हा निर्णय महिला हक्कांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

Surabhi Jayashree Jagdish

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांनाही विवाहित महिलांप्रमाणेच कायद्याचं संरक्षण मिळू शकतं असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. न्यायालयाने भारतीय दंड संहितेतील (IPC) कलम 498A चा आवाका वाढवत लग्न करण्याचा स्पष्ट हेतू असलेल्या लिव्ह-इन नात्यांनाही या कलमाचं संरक्षण लागू होईल, असं स्पष्ट केलंय.

न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने म्हटलंय की, शहरी भागांमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिप ही आता बऱ्याच अंशी स्वीकारली गेलेली वास्तवता आहे. त्यामुळे अशा प्रकारचं नातं निवडणाऱ्या व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन कायद्यानेही काळानुसार बदलणं गरजेचं आहे.

न्यायालयाच्या मते, जर एखादं लिव्ह-इन रिलेशनशिप हे प्रत्यक्षात लग्नासारख्या स्वरूपाचं असेल आणि त्यामागे लग्नाचा हेतू दिसून येत असेल तर त्या नात्यातील पुरुषाविरोधात महिलेवर क्रूरतेचा आरोप झाल्यास कलम 498A अंतर्गत गुन्हा दाखल करता येईल.

मात्र, हे संरक्षण प्रत्येक लिव्ह-इन नात्याला लागू होणार नाही. न्यायालयाने स्पष्ट केलंय की, हे तत्त्व फक्त अशा नात्यांनाच लागू होईल जे दोन सज्ञान व्यक्तींनी परस्पर संमतीने स्वीकारलेलं असेल.

त्याचप्रमाणे, कलम 498A संदर्भात केलेली ही विस्तारित व्याख्या केवळ याच कलमापुरती मर्यादित असेल. या निर्णयाचा इतर कोणत्याही कायदेशीर तरतुदींवर परिणाम होणार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय.

अटक करण्याबाबत महत्त्वाचे निर्देश

अटक करण्याबाबतही न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिलेत. लिव्ह-इन पार्टनर किंवा लग्नासारख्या नात्यात राहणाऱ्या व्यक्तीला किंवा त्याच्या नातेवाईकांना महिलेवर क्रूरतेचा आरोप झाला म्हणून थेट अटक करता येणार नाही. अटक करण्यापूर्वी प्राथमिक चौकशी करणं बंधनकारक असेल आणि अटक तसंच इतर प्रक्रियेशी संबंधित सर्व कायदेशीर नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागेल.

न्यायालयानं असंही नमूद केलंय की, जर एखादी महिला लग्नापूर्वीच पुरुषासोबत एकाच घरात राहत असेल, तर तिलाही विवाहित महिलेला मिळणारे कायदेशीर संरक्षण मिळायला हवेत.

निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचं निरीक्षणही नोंदवलंय. कोणतीही व्यक्ती नातं सुरू करताना भविष्यात तिच्यावर अत्याचार किंवा क्रूरता होईल असा विचार करून नात्यात प्रवेश करत नाही. प्रत्येक जोडपं आपलं नाते चांगल्या हेतूने सुरू करतात आणि आनंदी आयुष्याची अपेक्षा ठेवतात. परंतु काही काळानंतर नात्यांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तींचं संरक्षण करण्यासाठी कायद्यात योग्य तरतुदी असणं आवश्यक आहे.

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पुरुषावर भारतीय दंड संहितेच्या कलम 498A अंतर्गत कारवाई करता येईल का, या कायदेशीर प्रश्नावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

SCROLL FOR NEXT