Ramdev Baba Saam Tv
देश विदेश

Baba Ramdev : बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; प्रसिद्ध माफीनाम्यावर समाधान व्यक्त

Baba Ramdev Apology : बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन यांनी जाहिर केलेल्या माफीनाम्यावर कोर्ट पुढे काय आदेश देणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. आज या प्रकरणात माफीना कोर्टाने मान्य केला आहे.

Ruchika Jadhav

प्रमोद जगताप

सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन यांना मोठा दिलासा दिला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी प्रसिद्ध केलेल्या माफीनाम्याच्या भाषेवर कोर्टाने समाधान व्यक्त केलंय. तसेच दोघांनाही पुढील सुनावणीला कोर्टात वैयक्तिक हजर राहण्यापासून देखील सूट दिली आहे.

पतंजली फसव्या जाहिरात प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीला बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन यांनी जाहिर केलेल्या माफीनाम्यावर कोर्ट पुढे काय आदेश देणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. आज या प्रकरणात सदर माफीना कोर्टाने मान्य केला आहे.

आधिच्या सुनावणीत काय झालं होतं.

या आधी झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने म्हटलं होतं की, तुम्ही जेवढ्या आकाराच्या जाहिराती छापल्या होत्या तेवढ्याच आकाराचा माफीनामा छापला आहे का? तुम्ही छापलेल्या जाहिरातींच कटिंग कोर्टाला पाठवा, अशा सूचना न्यायमूर्ती हीमा कोहली यांनी दिल्या होत्या.

तसेच बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना पुढील दोन दिवसांत ऑन रेकॉर्ड माफीनामा देण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. यामध्ये आमची चूक झाली असे लिहिण्याचे आदेश देखील कोर्टाकडून देण्यात आले होते. त्यावर बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना ऑन रेकॉर्ड माफीनामा सादर केला.

पुढील सुनावणी केव्हा

कोर्टाने या प्रकरणाची व्याप्ती वाढवली आहे. आणखी काहींना यात पक्षकार बनवलं असून त्यांनाही नोटिस पाठवण्यात आल्या आहेत. यावर 7 मेला सुनावणी होणार आहे. फसव्या जाहीरातप्रकरणी पुढील सुनावणी 14 मे रोजी होणार आहे.

माफीनाम्यात काय म्हटलंय?

भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे/आदेशांचे पालन न करणे यासाठी आम्ही वैयक्तिकरित्या जबाबदार आहोत. (रिट याचिका क्र. 645/2022). तसेच, कंपनीकडून बिनशर्त माफी मागितली आहे. 22.11.2023 रोजी मीटिंग/पत्रकार परिषद आयोजित केल्याबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करत आहोत. जाहिरात प्रकाशित करताना आमच्याकडून झालेल्या चुकीबद्दल आम्ही मनापासून दिलगीरी व्यक्त करत आहोत. अशाप्रकरच्या चुका पुन्हा होणार नाहीत, याचे आम्ही वचन देतो, अशा शब्दांत बाबा रामदेव यांनी वर्तमानपत्रात माफीनाफा सादर केला होता. त्यानंतर कोर्टाने त्यांना ऑन रेकॉर्ड माफीनामा देण्यास सांगितला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Narkar Fitness: चाळीशी नंतरही फिट राहण्यासाठी ऐश्वर्या नारकर काय करते? जाणून घ्या

Beed Crime: बीड हादरले! वाल्मीक कराडच्या समर्थकाकडून गतीमंद मुलीवर बलात्कार

Pune : तोंडावर स्प्रे मारून तरुणीवर बलात्कार, 'मी परत येणार' सेल्फी काढत दिली धमकी

Pune Mahanagpalika Bharti: खुशखबर! पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

Dharashiv : ऑनलाइन गेमिंगमुळे मॅनेजर कंगाल झाला, बँकेतून २५ लाख ढापले अन् ...

SCROLL FOR NEXT