Sunanda Pushkar death case: शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता  
देश विदेश

Sunanda Pushkar death case: शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संपुर्ण भारतातील राजकारण ढवळून काढणाऱ्या सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी (Sunanda Pushkar death case) काँग्रेस खासदार शशी थरूर (Congress MP Shashi Tharoor) यांची दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेस खासदार शशी थरूर यांची दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दिल्ली पोलिसांनी  शशी थरूर यांच्या विरोधात या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून घोषित केले होते.

मात्र न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर थरूर यांनी न्यायालयाचे आभार मानले. गेल्या साडेसात वर्षांपासून या प्रकरणात मला यातना आणि वेदना सहन कराव्या लागत होत्या. असेही यावेळी शशी थरुर यांनी म्हटले आहे.

हे देखील पहा-

17 जानेवारी 2014 रोजी सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलमध्ये सापडला होता. दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात शशी थरूर यांना मुख्य आरोपी बनवले होते. दिल्ली कोर्टाने सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात थरूर अद्याप जामिनावर बाहेर होते. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम 498 ए आणि 306 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते.

काय आहे सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण

17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचं निधन झालं. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी पुष्कर यांनी पती शशी थरूर यांचे एका पाकिस्तानी पत्रकाराशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी शशी थरुर यांच्यावर पत्नी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपी लावण्यात आला होता. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघाल होतं.

या प्रकरणी, 29 सप्टेंबर 2014 रोजी एम्सच्या वैद्यकीय टीमने केलेल्या शवविच्छेदन अहवालात सुनंदा यांचा मृत्यू विषानं झाल्याचं म्हटलं होतं. तसेच, सुनंदा यांच्या पोटात अशी अनेक रसायने आढळली आहेत, जी पोटात गेल्यानंतर किंवा रक्तात मिसळल्यानंतर त्याचं विषात रुपांतर झाल्याचं संबंधित वैद्यकीय टीमनं म्हटलं होतं.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

Arabian Sea Shiv Smarak : 8 वर्ष झाली, स्मारक दुर्बिणीतूनही दिसत नाही; अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले

SCROLL FOR NEXT