Sultanpuri Delhi News  SAAM TV
देश विदेश

Delhi Sultanpuri News : घटनेआधी पार्टीत मध्यरात्री 2 तरुणींमध्ये झाला होता वाद, हॉटेल मॅनेजरनं काय सांगितलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण घटनेच्या रात्री एका हॉटेलात बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करण्यासाठी गेल्या होत्या आणि त्यानंतर त्या स्कुटीवरून परतत होत्या.

Nandkumar Joshi

Sultanpuri Delhi News : दिल्लीच्या (Delhi) कंझावाला घटनेच्या पोलीस चौकशीत नवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण घटनेच्या रात्री एका हॉटेलात बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करण्यासाठी गेल्या होत्या आणि त्यानंतर त्या स्कुटीवरून परतत होत्या. त्याचवेळी अपघात झाला.

पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरकडे चौकशी केली. त्यावेळी त्या रात्री दोन्ही तरुणींमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून बाचाबाची झाली होती, असं मॅनेजरनं सांगितलं. याबाबतचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

पार्टीमध्ये दोन्ही तरुणींमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून वाद झाला होता. त्यावेळी वाद न घालण्याची विनंती त्यांना केली होती, असं हॉटेलच्या मॅनेजरनं सांगितलं. मात्र, त्या दोघींनी काहीही एक ऐकलं नाही. त्यानंतर हॉटेलमधून बाहेर पडल्यावरही त्या दोघींमध्ये वाद सुरूच होता. दोघींमध्ये वाद सुरू असताना, आजूबाजूच्या काही लोकांनी मध्यस्थीही केली होती. त्यानंतर त्या दोघी स्कुटीवरून निघून गेल्या, असंही मॅनेजरनं सांगितलं. मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, पीडित तरुणीनं पार्टीसाठी स्वतःच खोली बुक केली होती. पार्टीवेळी पाच ते सात मुलंही होती. (Delhi News)

पोलिसांनी २ तरुणांना घेतलं ताब्यात

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या रात्री हॉटेलात उपस्थित असलेल्या दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. दोघांच्या चौकशीतून तरुणींमध्ये झालेल्या वादाची माहिती कळू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मागच्या शनिवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास दिल्लीच्या सुलतानपुरी-कंझावाला परिसरात रस्त्यावर एका कारने तरुणीला १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते. या कारमध्ये पाच तरूण होते. या घटनेत जखमी झाल्याने तरुणीचा मृत्यू झाला होता. या तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी त्या पाचही तरुणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांची कारही जप्त केली आहे.

सीसीटीव्ही फुटेज सापडले

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नशेत होते. ते सर्वजण मुरथलहून आपल्या घरी मंगोलपुरीला जात होते. त्याचवेळी तरूणी त्यांच्या कारमध्ये अडकली. कारने तिला १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेची फॉरेन्सिक पथकाने चौकशी केली आहे. कारच्या खालच्या बाजूला रक्ताचे डाग आढळून आले आहेत. मात्र, कारमध्ये कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. तसेच या घटनेच्या १५ मिनिटांपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kandi Pedha Recipe : साताऱ्याचा स्पेशल कंदी पेढा घरी कसा बनवावा? वाचा सीक्रेट रेसिपी

Filmcity Makeup Artist : मुलीमुळे आईचा झाला भंडाफोड, आर्टिस्ट नवऱ्याला संपववलं होतं, पत्नी-प्रियकराच्या कटाचा पर्दाफाश

Bigg Boss 19 : मराठमोळ्या अभिनेत्याची सलमान खानच्या 'बिग बॉस 19'मध्ये एन्ट्री? स्वत:च केला खुलासा

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाच्या आमदाराला राधाकृष्ण विखे पाटील यांची महायुतीत येण्याची खुली ऑफर

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का! खासदार विशाल पाटलांच्या कट्टर समर्थकांचा भाजपात प्रवेश

SCROLL FOR NEXT