SUGAR PRICE HIKE: 18 DAYS, ₹18 RISE; WILL SUGAR PRICES INCREASE saam tv
देश विदेश

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Sugar Price Hike : साखरेच्या दरात गेल्या 18 दिवसांत तब्बल 18 रुपयांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. सणासुदीच्या काळात साखर महागल्याने मिठाईच्या किंमतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • 18 दिवसांत साखरेच्या दरात तब्बल 18 रुपयांची वाढ

  • सणासुदीचा काळ सुरू होत असतानाच साखर महागल्याने ग्राहकांना मोठा फटका

  • साखरेचे दर आणखी वाढणार का, याकडे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष

सध्या सणासुदीच्या काळाला सुरुवात झाली असतानाच ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. साखरेच्या दरात मोठी वाढ झालीय. गेल्या 18 दिवसात साखरेच्या दरात तब्बल 18 रुपयांची वाढ झाली आहे. या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मिठाईची खरेदी विक्री होत असते.परंतु साखरेच्या वाढत्या दरामुळं मिठाईच्या किंमतीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

साखरेचा भाव 61 रुपये प्रति किलोवर

मध्य प्रदेशात साखरेच्या दरात (Sugar Prices ) मोठी वाढ होतेय. अवघ्या 18 दिवसांत साखरेचा भाव जवळपास 18 रुपये प्रति किलोने वाढलाय. भोपाळच्या घाऊक बाजारात साखरेचा भाव 61 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय. व्यापाऱ्यांच्या मते, साखरेच्या दरात इतकी मोठी वाढ याआधी कधीही झालेली नाही.

साखरेच्या दरात वाढ का होतेय?

व्यापाऱ्यांच्या मते, साखरेच्या वाढत्या किमतींचे एक प्रमुख कारण म्हणजे सरकारचे साठा धोरण आहे. केंद्र सरकारने सध्या साखरेच्या साठ्यावर खूप मोठी मर्यादा घातलीय. व्यापाऱ्यांच्या मते, जर ही साठा मर्यादा कमी केली, तर बाजारात उपलब्धता वाढू शकते. तसेच किमतीही काही प्रमाणात नियंत्रणात ठेवता येऊ शकतात.

इथेनॉल उत्पादनाचाही परिणाम

देशातील अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यावर भर दिलाय. इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा वाढल्याने साखरेच्या दरात वाढ झाल्याचं म्हटलं जातंय. साखरेऐवजी इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा काही भाग वापरला जात असल्याने साखर उत्पादनावर परिणाम झालाय. बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम किमतींवर होतोय.

सणासुदीचा हंगाम सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत, साखरेच्या वाढत्या किमतींचा परिणाम मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांवरही होऊ शकतो. व्यापाऱ्यांच्या मते, जर ही दरवाढ अशीच सुरु राहिली, तर येत्या काही दिवसांत साखर आणखी महाग होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2026: घरात अकाली मृत्यू झाला असेल, तर पितृपक्षात नक्की करा हे ३ उपाय; दिवंगत आत्म्याला मिळेल मोक्ष!

Mumbai : मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट, पश्चिम रेल्वेची कारवाई; पाहा Video

Shivali Parab: 'नाजूक ही नार...'; मराठमोळ्या लूकमध्ये शिवाली परबचं खुललं सौंदर्य

Maharashtra News Live Update : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

Latest Mangalsutra Designs: रोज घालण्यासाठी सुंदर आणि युनिक डिझाईन्सचे 5 मंगळसूत्र

SCROLL FOR NEXT