Smartphone Blast Saam Tv
देश विदेश

Smartphone Blast: खिशात ठेवलेल्या मोबाइलचा अचानक स्फोट, दैव बलवत्तर म्हणून वृद्ध थोडक्यात बचावला; व्हिडिओ व्हायरल

तुमच्याकडील मोबाइल जीवघेणा तर नाही ना?

Shivani Tichkule

Kerala Smartphone Blast: केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका वृद्धाने आपल्या खिशात ठेवलेला मोबाइल अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर फोनने अचानक पेट घेतला.  (Latest Marathi News)

दैव बलवत्तर म्हणून हा वृद्ध थोडक्यात बचावला आहे. मात्र, या घटनेमुळे वृद्धाला चांगलाच धक्का बसला आहे. फोन अधिक वेगाने ब्लास्ट झाला असता तर काहीही होऊ शकले असते. या वृद्ध व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असती. मोबाइल फोन स्फोटाची ही तिसरी घटना असल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले.

दरम्यान, याआधी मोबाइलवर (Mobile) व्हिडीओ पाहत असताना मोबाइलचा स्फोट झाल्यानं आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा केरळमध्ये (Kerala) असाच प्रकार घडला होता.

मोबाइलचा स्फोट झाल्यानं तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कोझिकोड जिल्ह्यात ही घटना घडली होती. त्यानंतर आता केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मोबाइलचा स्फोट झाला असून यात वृद्ध व्यक्ती थोडक्यात बचावला आहे.

तुमचा फोन स्फोटापासून कसा वाचवायचा?

मोबाइलचा स्फोटचे हे महिनाभरातील हे तिसरे प्रकरण आहे. अशा परिस्थितीत हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकते. त्यामुळे तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे. चला जाणून घेऊया कोणत्या कारणामुळे मोबाइलचा स्फोट होतो. कारण जाणून घेतल्यास, तुम्ही कोणत्याही मोठ्या धोक्याचे बळी होण्याचे टाळू शकता.

मूळ चार्जर वापरा

तुम्ही तुमचा फोन फक्त मूळ चार्जरनेच चार्ज करा. जर तुमचा मूळ चार्जर खराब झाला असेल, तर तुम्ही अधिकृत स्टोअरमधून नवीन मूळ चार्जर विकत घ्यावा. तुमच्या कंपनीचा मूळ चार्जर उपलब्ध नसेल, तर तुम्ही चांगल्या कंपनीचाच चार्जर घ्यावा.

सूर्यप्रकाशात ठेवून कधीही चार्जिंग करू नये

थेट सूर्यप्रकाशात ठेवून कधीही चार्जिंगवर ठेवू नये कारण यामुळे फोन गरम होऊ शकतो, ज्यामुळे स्फोट होण्याची शक्यता वाढते. जर तुमचा मोबाइल कोणत्याही कारणाने गरम होत असेल तर फोन लगेच वापरणे बंद करा. जेव्हा फोन सामान्य तापमानावर येतो तेव्हाच त्याचा वापर करा.

स्वस्त बॅटरी

फोनची बॅटरी खराब झाली की पैसे वाचवण्यासाठी लोक स्वस्तात किंवा लोकल बॅटरी टाकतात. परंतु, हे पैसे वाचवल्यास जीव गमावण्याचा धोका देखील वाढतो. स्वस्त बॅटरीमुळे फोनमध्ये ब्लास्ट होऊ शकतो.

चार्जिंगवर फोन असताना बोलणे

काही लोक फोन चार्जिंगवर असताना फोनचा वापर करतात. पण चार्जिंग दरम्यान फोनचे तापमान जास्त असते, त्यामुळे फोन गरम होऊ शकतो. अशा स्थितीत फोन वापरल्याने त्यावर अधिक दबाव निर्माण होईल, ज्यामुळे त्याचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे चार्जिंगवर फोन असताना बोलणे टाळावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT