निसर्गात नेहमीच आपल्याला अद्भुत दृश्य पाहायला मिळत असतात. कधी भयंकर पाऊस, कधी कडक ऊन, कधी त्सुनामी तर कधी चक्रीवादळ. काही दृश्ये खूपच थक्क करणारी असतात तर आणि काही अगदी हृदय पिळवटून टाकणारी असतात. तुम्ही चक्रीवादळ पाहिले असेल. वास्तविक वाऱ्याला जेव्हा हिंसक वळण मिळते तेव्हा त्याला चक्रीवादळ म्हणतात. काही चक्रीवादळं कमी प्रभावी असतात, तर काही इतके धोकादायक असतात की ते वादळाचे रूप धारण करतात आणि अगदी मोठ्या गोष्टी देखील सोबत घेऊन जातात. चक्रीवादळांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भीषण चक्रीवादळ पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हादरुन जाईल.
व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की चक्रीवादळ किती भीषण झाले आहे. त्याने खूप लांब लचक क्षेत्र व्यापले आहे. हे चक्रीवादळ इतके धोकादायक आणि वेगवान आहे की ते माणसाचे, अगदी मोठ्या वाहनांचेही नुकसान करू शकते. व्हिडिओमध्येही असेच दृश्य पाहायला मिळते आहे. चक्रीवादळामुळे एक कार उलटलेली ही दिसत आहे. मात्र, वादळी वाऱ्यामुळे गाडी गोल गोल फिरून पुन्हा सरळ झाली आणि वादळ शांत होताच चालक आरामात रस्त्यावरून निघून गेला. ही धक्कादायक घटना कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने दुरून आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली, जी सोशल मीडियावर व्हायरल झाली. एवढी भीषण वावटळ तुम्ही क्वचितच पाहिली असेल, ज्याने एवढी मोठी गाडीही हादरली असेल.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.