Shruti Vilas Kadam
या वयोगटातील मुलांनी आणि किशोरवयीनांनी दररोज किमान ६० मिनिटे मध्यम ते जोरदार शारीरिक हालचाल करावी. यात चालणे, खेळणे, सायकलिंग यांचा समावेश होऊ शकतो.
प्रौढांनी आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेची शारीरिक हालचाल करावी. वेगाने चालणे हा यासाठी योग्य पर्याय असून, साधारण ३० मिनिटे असे ५ दिवस करता येतात.
६५ वर्षांवरील व्यक्तींनीही आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेची हालचाल करण्याचे लक्ष्य ठेवावे. वेगाने चालणे यामध्ये समाविष्ट करता येते.
वय वाढल्यानंतर केवळ चालणे पुरेसे नसून संतुलन आणि स्नायू मजबूत करणारे व्यायामही आवश्यक असतात. विशेषतः ६५ वर्षांवरील व्यक्तींनी बॅलन्स अॅक्टिव्हिटी करण्याकडे लक्ष द्यावे.
व्यायामाची सवय नसेल तर सुरुवातीपासून जास्त चालण्याचा आग्रह करू नये. आपल्या क्षमतेनुसार कमी वेळेपासून सुरुवात करून हळूहळू वेळ आणि तीव्रता वाढवणे योग्य आहे.
दररोज ठराविक १० हजार पावले चालणे प्रत्येकासाठी आवश्यक असा सार्वत्रिक नियम नाही. आरोग्यासाठी मध्यम तीव्रतेची नियमित शारीरिक हालचाल महत्त्वाची आहे; वेगाने चालणे हा त्यातील एक पर्याय आहे.
ज्यांना हालचालींमध्ये अडचण, दीर्घकालीन आजार किंवा इतर आरोग्यविषयक समस्या आहेत, त्यांनी आपल्या शारीरिक क्षमतेनुसार व्यायामाचे प्रमाण ठरवावे. गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे.