Student Death in School x
देश विदेश

Student Death in School : रांगेत उभा असताना अचानक खाली कोसळला, शाळेच्या मैदानावर दहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

Student Death News : शाळेच्या पीटीच्या तासाला मैदानात उभा असताना दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Yash Shirke

  • पीटीच्या तासाला दहावीचा विद्यार्थी अचानक मैदानावर कोसळला.

  • विद्यार्थ्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे म्हटले जात आहे.

  • कुटुंबीयांनी शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

Student Death: पीटीच्या तासासाठी शाळेच्या मैदानात सर्व विद्यार्थी उभे होते. अचानक इयत्ता दहावीमध्ये शिकणारा विद्यार्थी जागच्या जागी कोसळला आणि त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या विद्यार्थ्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे म्हटले जात आहे. शाळा प्रशासनाने निष्काळजीपणा दाखवल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबाने केला आहे. ही घटना तेलंगणाच्या नैम नगर येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (११ सप्टेंबर) दुपारी तेलंगणाच्या हनामकोंडा जिल्ह्यातील नैम नगर येथील शाळेच्या परिसरात पी. जयंत वर्धन हा दहावीच्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी शाळेच्या मैदानात कोसळला. जमिनीवर कोसळल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पीटीच्या तासादरम्यान मित्रांसोबत खेळत असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिसांनी सांगितले की, जयंत हा इतर विद्यार्थ्यांसह रांगेत उभा असताना अचानक कोसळला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ही गोष्ट शाळा व्यवस्थापनाला सांगितली. त्यानंतर जयंतला तातडीने एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पुढे त्याला वारंगल येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी जयंतला मृत घोषित केले.

जयंतचे वडील रवी यांनी पीटी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. वेळेवर सीपीआर देण्यात आला नाही. माझ्या मुलाला गरज नसताना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. माझ्या मुलाच्या मृत्यूसाठी शाळा व्यवस्थापन जबाबदार आहे. शाळा कॅम्पसमध्ये एकही डॉक्टर नाही. वेळेवर सीपीआर मिळाला असता तर माझा मुलगा वाचू शकला असता, असे रवी यांनी म्हटले आहे. या प्रकरणी जयंतचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

'आनंदाचा शिधा' बंद होणार? लाडकी बहिण योजनेचा फटका

Two Group Clash : भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा; कार्यकर्ते आपापसात भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT