इंडोनेशियाला जोरदार भूकंपाचा धक्का; रिश्टर स्केलवर 7.7 तीव्रता, सुनामीचा इशारा जारी Saam Tv
देश विदेश

इंडोनेशियाला जोरदार भूकंपाचा धक्का; रिश्टर स्केलवर 7.7 तीव्रता, सुनामीचा इशारा जारी

इंडोनेशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : इंडोनेशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. देशाच्या हवामान विभागाने सांगितले आहे की, इंडोनेशियाने (Indonesia) पूर्व नुसा टेंगारा याठिकाणी ७.५ तीव्रतेच्या भूकंपानंतर सुनामीचा (Tsunami) इशारा दिला आहे. त्याचवेळी, युरोपीय- भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने (Science Center) भूकंपाची तीव्रता (Earthquake magnitude )७.७ दिली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू ५ किमी खोलीवर असल्याचे सांगण्यात आले आहेत.

GFZ जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (GFZ) ने सांगितले आहे की या वर्षी मे महिन्यामध्ये शुक्रवारी इंडोनेशियन सुमात्रा बेटाच्या (island Sumatra) वायव्य किनारपट्टीवर ६.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता. इंडोनेशियामध्ये भूकंपाचे धक्के नेहमीच जाणवत असतात. पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने सांगितले आहे की भूकंप केंद्राच्या १ हजार किमी अंतरावर असलेल्या किनारपट्टीवर धोकादायक लाटा येण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा-

भूकंपामुळे होणारी जीवितहानी कमी असल्याचे यूएसजीएसने सांगितले आहे. तथापि, या प्रदेशामध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपांमुळे त्सुनामी आणि भूस्खलनाचा धोका असल्याचे त्यात सांगितले जात आहे. इंडोनेशिया प्रशांत महासागराच्या रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. ज्यामुळे नेहमीच भूकंपाचे धक्के आणि सुनामी येतात. रिंग ऑफ फायर ही चाप सारखी असते, जिथे टेक्टोनिक प्लेट्स अनेकदा हलत असतात. (Strong earthquake shakes Indonesia)

ज्यामुळे भूकंप होतात. ही चाप जपानपासून आग्नेय आशिया आणि पॅसिफिक खोऱ्यापर्यंत पसरलेली आहे. २००४ मध्ये इंडोनेशियामध्ये मोठा भूकंप झाला होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ९.१ एवढी होती. त्यामुळे एवढी भयानक त्सुनामी आली. ज्यामुळे दक्षिण आशियामध्ये २.२ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या इंडोनेशियामध्ये १.७ लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast: दिल्लीत शक्तीशाली स्फोट, आगीचे लोळ, धुराचे लोट; रस्त्यावर रक्ताचा सडा, हादरवून टाकणारे PHOTO

Puffed Chapati Tricks: चपाती तव्यावर नीट शेकत नाही? लगेचच वातड होते? मग ही भन्नाट टिप ठरेल बेस्ट

Bomb Blast in Delhi: दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरांना अलर्ट

Breast Shape Change: लग्नानंतर स्तनांचा आकार वाढतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य

Delhi Red Fort Blast : दिल्लीतील स्फोटात ८ जणांचा मृत्यू, हाय अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT