Skating In Saree Instagram/@larissa_wlc
देश विदेश

जबरदस्त! साडी नेसून रस्त्यावर स्केटिंग; पाहा Video VIRAL

केरळच्या रस्त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे साडी नेसलेली एक मुलगी जबरदस्त स्केटिंग करताना दिसत आहे.

वृत्तसंस्था

केरळच्या रस्त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे साडी नेसलेली एक मुलगी जबरदस्त स्केटिंग करताना दिसत आहे. सोबतच रस्त्यावर वाहने धावत आहेत आणि रस्त्याच्या आजूबाजूला हिरवीगार झाडे पण आहेत हिरवळ दिसत आहे. हा व्हिडीओ ड्रोनने शूट केला आहे. (Woman Skating Wearing Saree)

हा व्हिडिओ केरळचा (Kerala) आहे. हा व्हिडीओ लॅरिसा नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केला असून खास गोष्ट म्हणजे लॅरिसा स्वतः स्केटिंग करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये लारिसा पांढऱ्या रंगाची साडी परिधान करून आहे. या व्हिडीओमुळे ती सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकत आहे. लॅरिसाने हा व्हिडिओ केरळमध्ये शूट केला आहे. व्हिडिओमध्ये ती स्केटिंग करताना दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करताना लॅरिसाने लिहिले की, जेव्हा मी हे केले तेव्हा माझ्याजवळ बरेच लोक जमले होते, त्यापैकी काहींनी सेल्फीही काढले. खूप मजा आली. पण मला सांगायचे आहे की साडी नेसून लॉंगबोर्ड करणे अजिबात सोपे नाही. यानंतर तिने जसा हा व्हिडिओ शेअर केला तसा तो व्हायरल झाला.

या व्हिडिओवर लोक अनेक कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ बहुतांश लोकांना आवडला आहे. काही वापरकर्त्यांनी सांगितले की ते हृदयस्पर्शी होते. काही म्हणाले की हे एक कौशल्य आहे. ही कला प्रत्येकात नसते, अश्या कमेंट्स व्हिडीओवर दिसून येत आहेत.

पाहा व्हायरल व्हिडिओ-

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT