Dog Attack CCTV Saam TV
देश विदेश

Dog Attack on School Girl : शाळकरी मुलीवर अचानक भटक्या कुत्र्यांचा हल्ला, लचके तोडत ओढत नेलं; भयानक VIDEO Viral

Viral Video : एका लहान मुलींवर ३-४ कुत्र्यांचा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

प्रविण वाकचौरे

Tamilnadu News :

भटक्या कुत्रांनी नागरिकांवर हल्ला केल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल किंवा व्हिडीओही पाहिले असतील. भटक्या कुत्रांच्या हल्ल्यात लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. भटकी कुत्री अनेकदा लहान मुलांवर हल्ला करतात. अशीच एक घटना तामिळनाडूमधून समोर आली आहे.

एका लहान मुलींवर ३-४ कुत्र्यांचा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी तामिळनाडूच्या होसूरमध्ये ही घटना घडली आहे. ही भयावह घटना  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओतील दृष्यांनुसार, मुलगी रोजप्रमाणे शाळेत जाताना दिसत आहे. घरापासून थोड्या अंतरावर जाताच तिला तीन कुत्र्यांनी घेरलं. आधी मुलीने कुत्रांना हुसकण्याचा प्रयत्न केला. मात्र एका कुत्र्याने आता अचानक तिच्या हल्ला चढवला. त्यानंतर इतर दोन कुत्र्यांनीही तिच्यावर हल्ला केला. (Latest news)

कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर मुलगी रस्त्यावर पडली. त्यावेळी कुत्रे अक्षरश: तिला ओढून नेतांना दिसले. मात्र मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून एक व्यक्ती धावत रस्त्यावर आला. त्याने कुत्र्यांना हुसकलं आणि मुलीची सुटका केली. त्यानंतर या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT