नवऱ्याची बायकोसाठी अजब ऑफर! बायको शोधून देणाऱ्याला मिळणार 5 हजार रुपये Saam Tv
देश विदेश

नवऱ्याची बायकोसाठी अजब ऑफर! बायको शोधून देणाऱ्याला मिळणार 5 हजार रुपये

शोधणाऱ्याला बक्षीस देणार अशी पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : कुणी जर बेपत्ता झाले आहे आणि त्याला शोधणाऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे, अशा जाहिराती तुम्ही बघितले असतील. पण एका नवऱ्याने मात्र चक्क आपली बायको पळून गेली (Wife) आहे. आणि तिला शोधणाऱ्याला बक्षीस देणार अशी पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील (West bengal) हे प्रकरण आहे. बायको (Wife) मुलासह बेपत्ता झाली असून ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर पळून गेल्याचा संशय नवऱ्याला आहे. पिंगला गावामध्ये (village) राहणारी ही व्यक्ती कार्पेन्टर आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार तो कामानिमित्त हैदराबादला (Hyderabad) गेला होता. तेव्हा बायको, मुले बेपत्ता झाल्याचे ९ डिसेंबरला त्याला कळले. दुसऱ्या दिवशी तो त्यांना शोधण्याकरिता घरी आला. वेगवेळ्या ठिकाणी जाऊन त्याने त्यांना शोधायचा प्रयत्न करत आहेत. पण ते काही सापडले नाहीत. अखेर त्याने सोशल मीडियाची (social media) मदत घेतली. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने नेटिझन्सनना आपल्याला मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. फेसबुकवर (Facebook) त्याने पोस्ट देखील केली आहे. त्याने पोस्टमध्ये सांगितले आहे की, महिला आणि मुलगा ९ डिसेंबरपासून बेपत्ता झाले आहेत.

ज्यांना कुणाला ते मिळतील त्यांनी कृपया मला सांगावे. जो कुणी त्यांना शोधून आणणार आहे. त्यांना ५ हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. पतीने दिलेल्या माहितीनुसार की, घरात बायको, मुलगा आणि आई- वडिल राहत असायचे. घरात कधीच मोबाईल फोन नव्हता. एक व्यक्ती त्याच्या पत्नीकरिता मोबाईल फोन घेऊन आला होता. त्याच्याबरोबर ती रात्री एकटी बोलत राहायची. त्याच्यासोबत ती अगोदर एकदा पळून देखील गेली होती. ९ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास एक नंबर प्लेट नसलेली नॅनो कार त्याच्या परिसरामध्ये आली होती. त्या गाडीतून ती पळून गेली असणार आहे.

बायको एकटी खिडकी तोडू शकत नाही. यामुळे ज्याच्याबरोबर ती पळाली आहे. त्याच्या मदतीने तिने खिडकी तोडली असावी. घराबाहेर पडण्याअगोदरच तिने पैसे, दागिने, वोटर आयडी, आधारकार्ड आणि मुलांचे जन्म प्रमाणपत्र देखील घेऊन गेली आहे, असे त्याने यावेळी सांगितले आहे. बायको अगोदर एकदा पळून गेली होती. तिने भूतकाळामध्ये काय केले याची पर्वा नाही. माझ्या पत्नीला काहीतरी देऊन नादाला लावले असावे.

ती अशिक्षित असल्याने भुलली असावी. जर तिला मध्येच सोडले असेल तर ती घरीसुद्धा येऊ शकणार नाही. आता ते दोघे देखील परत येतील याची वाट बघत आहे. ते लोक परत यायला हवेत, मला त्यांच्याबरोबर राहायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार की एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कुटुंबाने याविषयी पोलिसांना कळवले नाही. पण आपण पोलिसांना कळवल्याचा दावा पतीने यावेळी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्री माणिकराव कोकाटेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार; मंत्रीपदही जाण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: बोरिवली लक्ष्मी अपार्टमेंट कार्टर रोड नंबर तीन इमारत पडली

IPL च्या इतिहासातील महागडा परदेशी खेळाडू, २५.२० कोटींची बोलीही लागली, तरीही ग्रीनला का मिळणार फक्त १८ कोटी?

Pappyachya Pinkichi Love Story: गुन्हा आणि प्रेमाची दमदार कहाणी; 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'चे पहिले पोस्टर प्रदर्शित

Secret Santa Gifts : 'सीक्रेट सांता'मध्ये काय गिफ्ट द्या? वाचा '10' युनिक गिफ्ट आयडिया, मैत्रिणी होतील खुश

SCROLL FOR NEXT