ब्रिटन मधील अजब प्रेम की गजब कहाणी  Saam Tv
देश विदेश

ब्रिटन मधील अजब प्रेम की गजब कहाणी

कुटुंबाचा विरोध करून त्यांनी लग्न केलं आणि...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ब्रिटन : प्रेमाला love वयाचं Age बंधन नसते, हे तुम्ही वाक्य आतापर्यंत बऱ्याच वेळा ऐकले असेल. हे वाक्य सिद्ध करणारी पहिली घटना ब्रिटनमध्ये Britain घडली आहे. एका ४५ वर्षांच्या महिलेने आपल्या मुलाच्या मित्रावरच friend प्रेम जडले. एवढंच काय, तर या महिलेने या मुलाशी लग्नही marriage देखील केले आणि आता दोघांचा राजा- राणीचा संसार देखील सुरु आहे.

एकदम फिल्मी वाटणारी ही स्टोरी खरोखरच घडलेली आहे. इंग्लंड England मधील वेस्ट ससेक्स West Sussex भागात राहणाऱ्या मॅरिलिन बटिगिग या महिलेने आपल्या मुलाच्या मित्राबरोबर विल्यम स्मिथशी याच्याशी लग्न केले आहे. विशेष म्हणजे विल्यम हा मॅरिलिनपेक्षा तब्बल २९ वर्षांनी लहान आहे. २००६ मध्ये या दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती. मॅरिलिनचा मुलगा विल्यमचा हा त्याचा मित्र होता. त्याच्यासोबत खेळण्यासाठी विल्यम नेहमी त्यांच्या घरी येत असत.

हे देखील पहा-

यानंतर मॅरिलिनच्या मुलासोबत खेळण्यासाठी म्हणून, विल्यम त्यांच्या घरी येत राहिला. यामधेच मॅरिलिन आणि विल्यममध्ये जवळीक अधिक वाढली. यावेळी विल्यम हा अवघ्या १६ वर्षांचा होता. यानंतर केवळ ३ वर्षांनी मॅरिलिन आणि विल्यमने यांनी लग्न करण्याचा निर्णय हाती घेतला. या दोघांचे कुटुंबीय आणि मित्राचा या लग्नाच्या विरोधात होते. मात्र, कोणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी अखेर लग्न केले आहे. लग्नानंतर बऱ्याच नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्यांच्याशी कायमचे संबंध तोडले.

पण एवढे सगळे होऊन देखील त्या दोघांनी एकमेकांची साथ कधी सोडली नाही. या दोघांच्या लग्नापूर्वी मॅरिलिनला ७ मुले होते. मात्र, सर्व कुटुंबानेच मॅरिलिनशी बोलणे टाकले. आता विल्यमचा मित्र असणारा मॅरिलिनचा मुलगा सोडून, कोणीही तिच्याशी बोलत नाहीत. तर दुसरीकडे विल्यमच्या कुटुंबीयांनीही त्याच्याशी बोलणे सोडले आहे. या दोघांच्या लग्नाला नुकतीच १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.

अजून देखील या दोघांमध्ये तेवढेच प्रेम आहे. जेवढे सुरुवातीला होते. विल्यम म्हणतो, मॅरिलिन आणि माझ्यात काहीतरी खास नाते आहे. ती तेव्हाही माझी ड्रीम वुमन होती, आणि आता देखील आहे. मॅरिलिन म्हणते, की लोकांचे टोमणे ऐकून आम्ही एकमेकांची साथ कधी सोडली नाही. कारण आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेत आहोत. विल्यम हा एक फिल्म प्रोड्यूसर आहे.

हे दाम्पत्य आता आपल्या लव्हस्टोरी मधील एक सिनेमा तयार करणार आहेत. यासाठी विल्यम क्राऊडफंडिंगद्वारे पैसे सध्या जमा करत आहे. आपली कथा आपल्या पद्धतीने पडद्यावर मांडल्यावर तरी किमान जास्त एज गॅप असणाऱ्या कपल्सकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलेल, अशी त्यांना भावनिक आशा आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT