Charles Shobhraj Saamtv
देश विदेश

Bikini Killer: स्वतःची केस स्वतः लढवणारा बिकीनी किलर; चक्क तुरुंगातील कैद्यांना द्यायचा कायद्याचे धडे

हत्येच्या गुन्ह्यात चार्ल्स शोभराजने कनिष्ठ न्यायालयापासून भारताच्या उच्च न्यायालयापर्यंत केस लढवत स्वतःला निर्दोष सिद्ध केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Crime News: नेपाळच्या( Nepal) सर्वोच्च न्यायालयाने १९ वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले आणि गुन्हेगारी जगताला हादरवुन सोडणाऱ्या बिकीनी किलरची पुन्हा चर्चा सुरू झाली.गुन्हेगारीच्या जगात 'बिकिनी किलर' आणि 'सिरियल किलर' अशी ओळख असलेल्या शोभराजवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे.

आपल्या गुन्हेगारीसाठी तर चार्ल्स शोभराज प्रसिद्ध होताच पण त्याच्या जेलमधून पळून जाण्याचे, हुशारीचे आणि स्वतःची केस स्वतः लढवत निर्दोष सिद्ध करण्याचे किस्सेही प्रचंड गाजले. यामध्ये भारतात असताना त्याने तिहार जेलमधून तुरूंग अधिकाऱ्यांना गुंगारा देत पळ काढला होता ज्यानंतर अनेक अधिकारी निलंबित झाले होते.

व्हिएतनामी वंशाच्या चार्ल्स शोभराजचा जन्म 1944 मध्ये व्हिएतनामच्या होची मिन्ह शहरात झाला. त्याची आई व्हिएतनामची होती आणि वडील भारतीय वंशाचे होते. लहान वयातच चार्ल्सने गुन्हेगारी जगतात प्रवेश केला होता. 1963 मध्ये शोभराजला चोरीच्या गुन्ह्यात पहिल्यांदा तुरुंगात जावे लागले होते. प्रथमच तो फ्रान्समधील पॉईसी तुरुंगात गेला.

 शोभराजने दक्षिण आणि आग्नेय आशियातील किमान 20 पर्यटकांना ठार मारले आहे, तसेच यामध्ये 14 थायलंडमधील पर्यटकांचा समावेश आहे. 1976 ते 1997 या काळात त्याला भारतातील तुरुंगात ठेवण्यात आले होते. मुलींशी मैत्री केल्यानंतर चार्ल्स त्यांना अंमली पदार्थ द्यायचा आणि त्यांची हत्या करत असे. परदेशी स्त्रिया त्याचा मुख्य बळी असायच्या. तो एवढा धूर्त होता आणि इतक्या चलाखीने गुन्हे करत असे की, त्याचा सुगावा लागण्याआधीच तो गुन्ह्यातून पसार व्हायचा. 

तिहार तुरूंगातून असा काढला पळ

चार्ल्स शोभराज असा कैदी होता ज्याला ठेवायला भारतातले कोणतेच तुरुंग सुरक्षित नाहीत असे बोलले जायचे. कारण तो वेश बदलण्यात, लोकांना पटवण्यात पटाईत होता. त्याच्या याच हुशारीने तिहार तुरूंंगात असताना त्याने तिहार तुरूंगातील अधिक्षक, जेलर, डेप्युटी जेलर या सर्वच अधिकाऱ्यांना निलंबित करावे लागले होते. तो दिवस होता 16 मार्च, 1986.

चार्ल्सने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत केकमध्ये सर्वांना गुंगीचे औषध देवून बेशुद्ध केले. आणि प्रचंड मजबूत असलेल्या तिहार जेलच्या कोठडीचे कुलूप तोडत पोबारा केला. मात्र तो पुन्हा पकडला गेल्यावर शिक्षा पूर्ण करून तो फ्रान्सला गेला. त्यानंतर नेपाळ दौऱ्यावर असताना त्याला पुन्हा अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षा झाली.

स्वतःची केस स्वतः लढवायचा चार्ल्स

आपल्या सराईत गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेला चार्ल्स कायद्याच्या भाषेतही प्रचंड निपुण होता. तो एक उच्चशिक्षित, कायद्याची समज असणारा, अस्सलखित इंग्रजी बोलणारा गुन्हेगार होता. म्हणूनच त्याने स्वतःवरील हत्येच्या खटलेची वकिली केली होती. इतकेच नव्हेतर या गुन्ह्यात त्याने कनिष्ठ न्यायालयापासून भारताच्या उच्च न्यायालयापर्यंत (High court) केस लढवत स्वतःला निर्दोष सिद्ध केले होते.

कैद्यांना शिकवायचा कायद्याची भाषा

चार्ल्स शोभराजचा अजब किस्सा म्हणजे तो तुरूंगातील कैद्यांना वकिलीचे ज्ञान द्यायचा. तो कायदे जाणणारा, उच्चशिक्षित गुन्हेगार होता. त्याला कायद्याचे ज्ञान होते. जेलमधील इतर कैद्यांना मात्र कायद्याचे शून्य ज्ञान होते. त्यामुळेच तो या कैद्यांना कायदेशीर सल्ले द्यायचा. जेलमध्ये अंडर ट्रायल असणाऱ्या कैद्यांच्या फाईली तो इंग्रजीमधून तयार करायचा. त्यामुळेच अनेक कैदी त्याच्याकडून कायदेशीर सल्ले घ्यायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाकडून उद्या ऑरेंज अलर्ट जारी

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT