Cctv Footage Bengaluru Saam Tv
देश विदेश

Cctv Footage Bengaluru : खळबळजनक! प्रेयसीला मदत केल्याने प्रियकर संतापला; चाकूने सपासप वार करत मैत्रिणीला संपवलं, घटनेचा थरारक VIDEO

Bengaluru Shocking News : बेंगळुरू येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सध्या हे सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. कर्नाटकातील बेंगळूरमध्ये एका २४ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर येत आहे. हत्या झालेली तरुणी मुळची बिहारमधील रहिवासी होती. बेंगळूर शहरातील एका पीजीमध्ये या तरुणीचा गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. ही तरुणी एका खाजगी कंपनीत कामाला असल्याचे समजते. बेंगळूरू पोलिसांनी तरुणीच्या हत्येचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून सध्या या फुटेजद्वारे अधिकचा तपास करण्यात येत आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, क्रिती कुमारी असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरुमधील कोरमंगला या परिसरातील पीजीमध्ये राहत असलेल्या २४ वर्षीय कृतीची गळा चिरुन हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, क्रिती मुळची बिहारची असून ती एका खाजगी कंपनीत काम करत होती आणि कोरमंगला येथील व्हीआर लेआउटमध्ये काम करत होती.

मंगळवार २२ जुलै साधारण रात्री ११ ते ११.३० दरम्यान एका संशयित व्यक्तीने चाकू घेऊन कृती राहत असलेल्या पीजीच्या आवारात प्रवेश केला, असे पोलिसांच्या तपासात समोर आले. या व्यक्तीने तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीजवळ येऊन क्रितीवर हल्ला(attack) केल्याचा पोलिसांनी संशय आहे. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक तपासात संशयित मारेकरी हा मूळचा मध्य प्रदेशातील भोपाळचा रहिवासी असून आरोपीचे नाव अभिषेक असल्याचे समोर आहे.

सीसीटीव्हीमध्ये काय?

सीसीटीव्हीमध्ये तुम्ही पाहू शकता, मारेकरी हातात पिशवी घेऊन पीजीमध्ये असलेल्या खोलीच्या दिशेने जात आहे. तिथे गेल्यानंतर तो खोलीचा दरवाजा ठोठावतो काही वेळानंतर क्रितीला तो ओढून बाहेर आणतो आणि तात्काळ तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात करतो. हल्ला केल्यानंतर तो तेथून पळ काढतो. क्रितीचा आवाज ऐकून पीजी इमारतीत(building) असलेल्या अनेक तरुणी घटना स्थळी पोहचतात.

हत्येचे कारण

आरोपी अभिषेक हा क्रितीचा मित्र होतो शिवाय तो क्रितीच्या एक सहकारीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. आरोपी अभिषेकची मैत्री(friend) ही महाराष्ट्रातली होती. अभिषेक मैत्रिणीला भेटण्यासाठी वारंवार पीजीमध्ये ये-जा करत होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक आणि त्याच्या मैत्रिणीचे संबंध बिघडले होते. त्यामुळे त्याच्या मैत्रिणीने त्याच्या पासून लांब राहण्यास सुरुवात केली. अनेकदा अभिषेकने त्या राहत असलेल्या आधीच्या पीजीमध्ये जाऊन वारंवार वाद घालत असे. त्यामुळे क्रितीने तिच्या मैत्रिणीला नवीन पीजीमध्ये शिफ्ट केले याचा राग अभिशेषकच्या मनात होतो. त्यामुळे राग अनावर झाल्याने अभिषेकने क्रितीची निघृण हत्या केली, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahesh Kothare: महेश कोठारे म्हणाले मी मोदी भक्त; संजय राऊतांनी उडवली खिल्ली, म्हणाले - 'तात्या विंचू रात्री येऊन...'

Diwali Accident : ऐन दिवाळीत आक्रित घडलं, धाराशिवमध्ये दोन अलिशान कारचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

Buldhana : सणासुदीच्या काळात गावात दूषित पाण्याने बाधा; पिंप्री अनेकांना गावात डायरियाची लागण

Yawning Causes: वारंवार जांभई येणं म्हणजे थकवा नव्हे; जाणून घ्या यामागची खरी कारणं

Bigg Boss 19 : गौरव खन्ना विरुद्ध संपूर्ण घर; ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार,पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT