SSC Paper Evaluation Controversy Saam tv
देश विदेश

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

SSC Paper Evaluation Controversy : दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेला हादरा बसला आहे.

Saam Tv

राज्याच्या शिक्षण व्यवस्थेला हादरवणारे दृश्ये समोर आली आहेत. सहावीच्या वर्गातील दोन मुली.... पेपर तपासताहेत तो एसएससी बोर्डाच्या मराठी विषयाचा.... आणि ही घटना घडलीय सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी गावातील शाळेत....

सातारा जिल्ह्यातील फलटणच्या विडणीतील उत्तरेश्वर हायस्कूलच्या वैभव शेंडे या शिक्षकाने दहावीच्या मराठीच्या पेपर तपासणीसाठी मदत घेतलीय ती इयत्ता सहावीच्या दोन विद्यार्थिनींची...या धक्कादायक प्रकाराचा सीसीटीव्हीच समोर आलाय.

मात्र या प्रकरणी सरकारने कारवाईचे आदेश दिलेत... तर शिक्षकानेही आपली बाजू मांडलीय... एकीकडे कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडालाय... तर दुसरीकडे सहावीच्या विद्यार्थिनींना दहावीचे पेपर तपासायला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची लक्तरं वेशीला टांगली गेलीयेत. त्यामुळे या कामचुकारपणा करणाऱ्या आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षकावर कारवाई होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मी जरांगेला भाव देत नाही; काँग्रेस नेत्याची सडकून टीका

Foods for heart health: हदयाच्या रक्तवाहिन्यांना चिकटलेलं कोलेस्ट्रॉल निघत नाहीये? डॉक्टरांनी सांगितलं हे 5 पदार्थ दररोज खा

Kunbi caste certificate: खापरपंजोबांपासून कुणबी नोंद, तरीही जात पडताळणी प्रमाणपत्र रखडवलं; अख्खं कुटुंब टेन्शनमध्ये, दोघे पाण्याच्या टाकीवर चढले

Maharashtra News Live Update: गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित अंतरवाली सराटीत दाखल

फ्रिजमध्ये ठेवूनही लिंबू सुकतंय? ही सोपी ट्रिक वापरा, बराच काळ राहील फ्रेश आणि रसाळ...

SCROLL FOR NEXT