Mahinda Rajapaksa
Mahinda Rajapaksa Saam Tv
देश विदेश

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा, देशात आणीबाणीच्या काळात राजकीय संकट!

वृत्तसंस्था

श्रीलंका देश सध्या भीषण आर्थिक संकटातून जात आहे. देशात आणीबाणी लागू आहे. श्रीलंकेत आणीबाणीच्या काळात आता राजकीय संकट निर्माण झाले आहे. महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa Resigns) यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

महिंदा राजपक्षे यांच्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री असलेल्या प्राध्यापक चन्ना जयसुमना यांनीही राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. या देशातील आर्थिक संकटाच्या निषेधार्थ झालेल्या हिंसक संघर्षानंतर पंतप्रधान आणि आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे असे म्हणले जाते आहे. आर्थिक संकटाच्या निषेधार्थ राजधानी कोलंबोमध्ये सोमवारी हिंसाचार झाला होता.

आंदोलक विरोधक आणि महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांमध्ये आर्थिक संकटावरून हिंसक संघर्ष झाला. या हल्ल्यात महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यात 16 जण जखमी झाले आहेत. तर, राजधानी कोलंबोमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षाकडूनही पंतप्रधानांच्या राजीनाम्याची आणि संयुक्त सरकार स्थापनेच्या मागणीसाठी सातत्याने निदर्शने सुरु आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT