Sri Lanka
Sri Lanka Saam Tv
देश विदेश

श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांना PM पदावरुन हटवणार; राष्ट्रपतींची सहमती

साम वृत्तसंथा

श्रीलंकेतील (Sri Lanka) आर्थिक संकट अधिक गडद होत चालले आहे. त्यामुळे तेथील राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. आता श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाभाया राजपक्षे यांनी त्यांचे भाऊ महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांना पंतप्रधानपदावरून हटवण्या संबंधी सहमती दर्शवली आहे. श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा सामना करतं आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत सरकारविरोधात आंदोलने सुरु झाले आहेत. आंदोलक राष्ट्रपती गोटाभाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

हे देखील पाहा

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत महागाईने उच्चांक गाठला आहे. श्रीलंकेत खाद्यपदार्थांसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय पर्यटकांची कमतरता, जीवनावश्यक वस्तूंची निर्यात मंदावणे आणि आयात वाढणे यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. श्रीलंकेतील परकीय चलनाचा साठा कमी झाला आहे.

२०१९ च्या निवडणुकीपूर्वी श्रीलंकेतील सत्ताधारी पक्ष एसएलपीपीने दोन मोठी आश्वासने दिली होती. पहिला कर कमी करणार, आणि दुसरा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेणार. सरकार स्थापन झाल्यानंतर ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी पावले उचलण्यात आली. त्यामुळे सरकारची तिजोरी अधिकच रिकामी झाली.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कोल्हापुरात शरद पवार गटाच्या जयकुमार शिंदेंनी दिला राजीनामा

Solo Trip: लग्नानंतर सोलो ट्रीपला जाण्याचे फायदे जाणून घ्या ?

T-20 World Cup 2024: T-20 WC स्पर्धेतील सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर! टीम इंडिया या संघासोबत करणार दोन हात

Effects of Fruit Juice: उन्हाळ्यात फळांचा ज्यूस पिताय? जाणून घ्या दुष्परिणाम

Pune Crime News: पुण्यामध्ये पुन्हा 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरचौकात ६ जणांनी तरुणांची केली निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT