Road Accident in Bihar
Road Accident in Bihar ANI
देश विदेश

Accident News: भरधाव स्कॉर्पिओची दुचाकीसह ट्रकला धडक; भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, थरारक घटनेचा VIDEO

Satish Daud

Bihar Road Accident Latest News

भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओने समोरून जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर कार अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली. या घटनेत दुचाकीस्वारासह ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात बिहारच्या कैमूर जिल्ह्यात रविवारी (२५ फेब्रुवारी) सायंकाळी झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. मृतांची ओळख अद्याप पटली नसून मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे. अपघातात कुणीही जखमी नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त स्कॉर्पिओ (Accident News) सासारामहून वाराणसीच्या दिशेने जात होती. या कारमधून ८ जण प्रवास करीत होते. देवकाळी गावाजवळ स्कॉर्पिओ येताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने दुचाकीस्वाराला धडक दिली. (Latest Marathi News)

त्यानंतर कार दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटनेरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता, की दुचाकीसह स्कॉर्पिओचा अक्षरश: चुराडा झाला. या घटनेत दुचाकीस्वारासह स्कॉर्पिओमधून प्रवास करणाऱ्या ८ जणांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग NH-2 वर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच मोहनिया ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election Exit Poll: महाराष्ट्रात महायुती की मविआची सरशी? सट्टाबाजारात कुणाची तेजी?

SAAM Impact: कोयना परिसरातलं गाव GST आयुक्तांनी विकत घेतलं, जमीन सरकारजमा होणार

Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्चसाठी तयार, Ola आणि TVS देणार टक्कर

Sourav Ganguly: टीम इंडियाला कसा प्रशिक्षक हवा? गंभीरच्या नावाची चर्चा असताना सौरभ गांगुलीचा BCCIला सल्ला

Special Report : पोरानं चिरडलं, अख्खं कुटुंब तुरूंगात गेलं; 3 पिढ्या गजाआड

SCROLL FOR NEXT