Space Story Saam Digital
देश विदेश

Space Story : ३.३० लाख किमी अंतर, यानात भीषण स्फोट; तरीही नील आर्मस्ट्राँगलाही जमलं नाही, ते या तिघांनी केलं

Apollo 13/NASA Apollo 13 Mission : १९७० नासाच्या एका मोहिमेदरम्यान ३ अतंराळवीर यानात स्फोट झाल्यामुळे ८ दिवस अतंराळात अडकून पडले होते, शिवाय पृथ्वीपासून इतक्या दूर गेले होते की आजपर्यंत माणसाला तिथंपर्यंत पोहोचता आलेलं नाही.

Sandeep Gawade

11 एप्रिल १९७०, अमेरिकेच्या कॅनडी स्पेस स्टेशनवरून अपोलो-१३ मोहिचं रॉकेट लॉन्च झालं, तो दिवस... तीन अंतराळवीरांना घेऊन हे नासाचं यान चंद्रावर उतरणार होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवून एक वर्षही उलटलं नव्हतं आणि नासाची ही चंद्रावरची तिसरी मोहीम होती. मागच्या दोन मोहिमा यशस्वी झाल्या होत्या, त्यामुळे तीनही अंतराळवीर पूर्ण आत्मविश्वासाने या रॉकेटमध्ये बसले होते, चंद्रावर उतरण हे एकच स्वप्न आणि ध्येय ...मात्र यावेळी काहीतरी वेगळचं घडणार होतं...शास्त्रज्ञांना याची जराही कल्पना नव्हती की त्यांचं चंद्रावर उतरण्याचं स्वप्न, स्वप्नच राहणार आहे. यान पृथ्वी आणि चंद्राच्या मध्यभागी होतं आणि अपोलो १३ यानात मोठा स्फोट होतो आणि इथून सुरू होतो जीवन मरणाचा थरारक प्रवास...

अपोलो १३ मोहिमेची अंतराळीत संकटाशी दोन हात करणाऱ्या माणसाच्या धैर्याची आणि तंत्रज्ञानाच्या सीमांची कसोटी लावणारी एक चित्तथरारक घटना आहे. ११ एप्रिल १९७० रोजी नासाने अपोलो १३ मोहिमेची सुरुवात केली. यानात तीन अंतराळवीर होते कॅप्टन जेम्स ए. लॉव्हेल (कमांडर), जॉन स्विगर्ट (कमांड मॉड्यूल पायलट) आणि फ्रेड हायझ (लूनर मॉड्यूल पायलट). फ्लोरिडातील अपोलो १३ यानाने कॅनेडी स्पेस सेंटर यशस्वी उड्डाण केलं. मोहिमेची सुरुवात अगदी सुरळीत झाली होती. यानाने अंतराळात प्रवेश केल्यावर सर्व यंत्रणांची चाचणी करण्यात आली आणि अतंराळवीरांचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू झाला. सर्वकाही काही योजनेप्रमाणे सुरू होतं.

१३ एप्रिल १९७० रोजी यान पृथ्वीपासून ३३०००० किमी अंतरावर होतं. अचानक मोठा धमाका झाला. इतका मोठा धमाका होता की संपूर्ण स्पेसक्राफ्ट हादरलं..यानात अलार्म वाजायला लागतात आणि समजत की यानातील ऑक्सिजनचा टँकचा स्फोट होऊन निकामी झाला आहे... तर दुसऱ्या ऑक्सिजन टँकमधील हवा वेगाने कमी होताना दिसते... पृथ्वीवर नासाच्या सेंटरमध्ये मीशन कन्ट्रोलरूममध्ये बसलेल्या शास्त्रज्ञांना विश्वास बसत नाही...यानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाली असेल वाटतं. मात्र अंतराळवीर कॅमेऱ्यातून हवा लिक होत असल्याचं दाखवतात आणि नासाला धक्का बसतो.. तर दुसरीकडे धमाक्यामुळे यान मार्गावरून दूर जात आहे, पृथ्वीपासून प्रत्येक सेंकंदाला किलोमीटरने दूर जात होतं. आणि एक क्षण असा येतो की यान इतक्या दूर जातं इतक्या दूर जातं क हा एक नवा रिकोर्ड बनतो... त्यानंतर आजपर्यंत अंतराळात इतक्या दूर जाणं शक्य झालेलं नाही. अता चंद्रावर उतरण तर सोडाच पण शास्त्रज्ञ जीवंत पृथ्वीवर येणार की नाही हा प्रश्न होता..

अपोलो १३ मोहिमेचं मुख्य केंद्र, जे कमांड मॉड्यूल म्हणून ओळखलं जातं, हेच यानाच्या मुख्य कार्यासाठी महत्त्वाचं होतं. पण स्फोटामुळे त्याची कार्यक्षमता जवळपास बंद झाली होती. आता अंतराळवीरांच्या हाती फार कमी पर्याय होते. चंद्रावर उतरणं तर सोडाच, पण आता त्यांचं मुख्य ध्येय म्हणजे पृथ्वीवर सुखरूप परत येणं होतं. परतण्यासाठी त्यांना जलद आणि अचूक निर्णय घेणं आवश्यक होतं. यासाठी त्यांनी लूनर मॉड्यूलचा (चंद्र लँडर) उपयोग करण्याचा निर्णय घेतला. हे मॉड्यूल मूळतः चंद्रावर उतरण्यासाठी बनवलं गेलं होतं, परंतु आता ते त्यांचं जीवनरक्षक साधन बनलं. मात्र, हे मॉड्यूल केवळ दोन अंतराळवीरांसाठी दोन दिवस पुरेल इतकीच ऊर्जा, ऑक्सिजन आणि पाण्याचं नियोजन असलेल्या साधनांनी सुसज्ज होतं. यामुळे तीन अंतराळवीरांच्या जीवनासाठी ही एक अत्यंत अवघड आणि जोखमीची परिस्थिती होती.

अंतराळवीरांच्या जीवनाचा प्रश्न असताना, ह्यूस्टनमधील मिशन कंट्रोलमधील अभियंते आणि शास्त्रज्ञ हे कोणताही धोका पत्करून त्यांना पृथ्वीवर आणण्याचा मार्ग शोधत होते. त्यांच्यासमोर प्रश्न होता की यानाला कसं परत आणायचं? कोणताही चुकीचा निर्णय अंतराळवीरांचं आयुष्य धोक्यात घालू शकला असता. त्यांनी मोठ्या धीराने आणि शिस्तीने योजना आखली.ऑक्सिजन वाचवण्यासाठी आणि ऊर्जा कमी वापरण्यासाठी त्यांनी अपोलो १३ यानाची काही उपकरणं बंद केली. त्यामुळे तिथल्या थंड वातावरणामुळे अंतराळवीरांना तापमानाच्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. तसंच, पाणी आणि अन्नाचा तुटवडाही होता. तरीही लॉव्हेल, स्विगर्ट, आणि हायझ यांनी धीर धरला आणि ह्यूस्टनकडून मिळणाऱ्या निर्देशांचं पालन केलं.

अपोलो १३ यानाला आता केवळ सुरक्षित परत आणायचं होतं. त्यासाठी त्यांना चंद्राचं गुरुत्वाकर्षण वापरून यानाला एका सुरक्षित कक्षेत ठेवावं लागणार होतं. मिशन कंट्रोलने शास्त्रज्ञांच्या मदतीने एक काळजीपूर्वक योजना आखली. यानाच्या इंजिनचं योग्य वेळी प्रक्षेपण करून त्याला एका वेगवान कक्षेत आणण्यात आलं, ज्यामुळे ते थेट पृथ्वीच्या दिशेने कूच झालं. यात आणखी एक आव्हान होतं. यानाच्या पुनःप्रवेश कॅप्सूलला पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना अत्यंत उच्च तापमानाचं तोंड द्यावं लागणार होतं. कॅप्सूलवर असलेला उष्णतारोधक थराला बाधा पोहोचली तर अंतराळवीरांना प्रचंड उष्णतेचा फटका बसला असता.

१७ एप्रिल १९७० रोजी अपोलो १३ यानाच्या अंतराळवीरांनी पॅसिफिक महासागरात यशस्वीरित्या लँडिंग केलं. जगभरातील लोकांनी या घटनेचा उत्सव साजरा केला. या अंतराळवीरांनी प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताणाखाली आपली चपळाई आणि कणखरपणा दाखवून दिला होता. ह्यूस्टनमधील मिशन कंट्रोल टीमनेही त्यांच्या अपार संयम आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर अंतराळवीरांना सुखरूप पृथ्वीवर आणण्यात यश मिळवलं.अपोलो १३ मोहिमेला "यशस्वी अपयश" म्हणून ओळखलं जातं. या मोहिमेने नासाच्या अंतराळ संशोधन क्षमतांची कसोटी पाहिली, परंतु चंद्रावर उतरण्याचं ध्येय न गाठता जगाने मानवाच्या धैर्याचं आणि विज्ञानाच्या अद्वितीय सामर्थ्याचं दर्शन घडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT