Bird Strike On Plane Google
देश विदेश

South Korea Plane Crash: एका छोट्या पक्ष्याच्या धडकेनं Plane Crash कसं होतं? किती धोकेदायक असते पक्ष्याची धडक

Bird Strike On Plane : दक्षिण कोरियामध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात १७० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झालाय.

Bharat Jadhav

दक्षिण कोरियामध्ये मोठी विमान दुर्घटना घडलीय. यात विमान दुर्घटनेत १७० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. ही दुर्घटना मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लँडिंग करताना झाली. विमान विमानतळावर उतरताना ते सरकलं त्यानंतर अनियंत्रित होत विमानतळावरील भिंतीला धडकलं. त्यानंतर विमानाने पेट घेतला.

मुआन अग्निशमन केंद्राचे प्रमुख ली जेओंग-ह्योन यांनी विमान अपघाताविषयीची कारणे दिली आहेत. म्हणाले, विमानावर पक्षी धडकणं हे देखील अपघाताचे संभाव्य कारण असू शकतं. पक्ष्याची धडक किती धोकेदायक असते हे आपण जाणून घेऊ.

बर्ड स्ट्राइक काय असतं?

जेव्हा पक्षी विमानावर धडकतात तेव्हा त्याला बर्ड स्ट्राइक म्हटलं जातं.

विमानाच्या सुरक्षेसाठी हा सर्वात सामान्य परंतु गंभीर धोक्यांपैकी एक आहे. टेक-ऑफ आणि लँडिंगच्या वेळी पक्ष्यांची धडक होत असते. प्रत्येक पक्ष्यांचा धडक ही जीवघेणा असते असे नाही. परंतु काही प्रकरणांत मोठा अपघात होण्याची शक्यता असते. जेव्हा पक्षी विमानाच्या बॉडीला धडकतात. तेव्हा ही सहसा गंभीर समस्या नसते. पण जर पक्षी विमानाच्या इंजिनमध्ये घुसतात तेव्हा इंजिनचं नुकसान होतं.

यामुळे थ्रस्ट विमानाचा वेग आणि नियंत्रण करण्यास अडचण निर्माण होत असते. इंजिनमध्ये अडकलेल्या पक्ष्यांमुळे इंजिनच्या पंख्याच्या ब्लेडला गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो. अशा परिस्थितीत पायलट सहसा जवळच्या विमानतळावर विमान उतरवण्याचा प्रयत्न करतात.

अमेरिकेत २००९ मध्ये बर्ड स्ट्राइकची मोठी घटना घडली होती. न्यूयॉर्कहून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमानाला पक्ष्यांची धडक झाली. या धडकेत US Airways Flight 1549 चे दोन्ही इंजिन निकामी झाले होते. कॅप्टन चेस्ली सुलेनबर्गर यांनी विमान हडसन नदीत सुरक्षितपणे उतरवण्यात आले होते. विमानात १५५ प्रवासी होते सर्व प्रवासी वाचले.

या दुर्घटनेत विमानात असलेल्या अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालीय. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमान लँडिंग करताना अचानक स्फोट झाला, त्याचा आवाज मुआनमध्ये जोरदार घुमला त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुटुंबीय असमाधानी; जरांगे पाटलांची घेणार भेट

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधव आमने-सामने

Jio OTT Plans: स्वस्तात धमाल! जिओचे ३ स्वस्त OTT प्लॅन, फक्त १०० रुपयांत ९० दिवस एंटरटेनमेंट

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT