संतोष शाळिग्राम
नवी दिल्ली - काॅंग्रेसच्या नेत्यांमध्ये असलेला अभाव यावर काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी आज तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे."देशासमोरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाकडून दररोज दिले जाणारे तपशीलवार निवेदन तालुका, जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाही, हा आपला अनुभव आहे. धोरणात्मक बाबींवर राज्यातील नेत्यांमध्ये स्पष्टत आणि एकवाक्यता दिसत नाही, अशा खरमरीत शब्दात सोनिया गांधी यांनी पक्ष नेत्यांना फटकारले.
हे देखील पहा -
काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत ठरल्याप्रमाणे संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होत असून यातील सदस्य नोंदणीचा पहिला टप्पा एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी पक्षाचे सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक आज काँग्रेस मुख्यालयात झाली. या बैठकीत बोलताना, सोनिया गांधींनी नेत्यांना सदस्य नोंदणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. कार्यकारिणी बैठकीमध्ये राहुल गांधींनी काॅंग्रेसला विचारसरणी भर देण्याची आवश्यकता असल्याचे व्यक्त केले होते. त्याचाच पुनरुच्चार सोनिया गांधी यांनी आज केला.
सोनिया गांधीनी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी संघर्ष करताना जनतेसमोर त्यांचा खोटेपणा उघड करणे आवश्यक असल्यावर भर दिला. मात्र, पक्षाचा संदेश पोहोचविण्यात नेते मंडळी कमी पडत असल्याच्या कानपिचक्या दिल्या. शिस्त आणि एकतेचे धडे देताना सोनियांनी नेत्यांना व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवण्याचेही आवाहन केले.
सोनिया यांना म्हटले आहे, की काॅंग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाला १ नोव्हेंबरपासून सुरवात होत आहे. देशातील तरुणांना योग्य राजकीय व्यासपिठ उपलब्ध करून देण्याचे आपले काम आहे. यासाठी सदस्य नोंदणीच्या अर्जांची योग्य छपाई करून प्रत्येक गावात, वाॅर्डामध्ये पोहचविण्याची व्यवस्था करावी. यासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आवश्यक असून ही लोकशाही, राज्यघटना आणि काॅंग्रेसची विचारसरणीच्या रक्षणाची लढाई आहे.
भाजप, संघाकडून पसरविल्या जाणाऱ्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची गरजही सोनिया गांधींनी यावेळी व्यक्त केली. केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडताना सोनिया म्हणाल्या, की उत्तरदायित्व पासून पळ काढण्यासाठी मोदी सरकार सर्व संस्था नष्ट करायला निघाले आहे. हा घटनेच्या तसेच लोकशाहीच्या मुलभूत तत्त्वांवर घाला आहे. यासोबतच, उत्तर प्रदेश, पंजाबसह आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काॅंग्रेसचा प्रचार तसेच जाहिरनामा पक्षाच्या धोरणानुसार समाजातील सर्व घटकांशी विचारविनिमय करून तयार केला जावा, अशीही सूचना सोनियांनी यावेळी केली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.