Sonam Wangchuk being taken to hospital by Delhi Police during his ongoing hunger strike protest in Delhi. saam tv
देश विदेश

सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश, 20 जुलैला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन, मोदी सरकारचं टेंशन वाढलं

Sonam Wangchuk hunger strike day 21 update: सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी अक्षरशा उचलून नेत रुग्णालयात दाखल केलं. मात्र, वांगचुक हे 20 जुलैला मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. वांगचुक यांनी रुग्णालयातून थेट देशवासीयांना संदेश पाठवलाय. तर दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकही सरकारला घेरण्याची चिन्हे आहेत. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून जबरदस्तीने उचलत थेट रुग्णालयात नेलं. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईमुळे जंतरमंतरवर मोठा गोंधळ उडाला होता. वांगचुक यांना रुग्णालयात डांबल्यानंतर आता कॉक्रोज जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झालीये. त्यातच सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून एक संदेश दिलाय.

वांगचुकांचा संदेश

स्वातंत्र्याचं दुसरं आंदोलन. भयमुक्त भारत, अन्यायमुक्त भारत

अन्यायाविरोधातील स्वातंत्र्यासाठी(पेपरफुटी प्रमाणे), भीतीपासूनही मुक्ती (मी बेकायदेशीररित्या ताब्यात).

भारतातील स्वातंत्र्याचा दुसरा लढा. संसदेवरील मोर्चाला मोठ्या प्रमाणात यशस्वी करा. मला बेकायदेशीरपणे रुग्णालयात नेलंय. हा संदेश मी गीतांजलीमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.

सोनम वांगचुक आंदोलनात सहभागी होऊ शकले नाही तर मी स्वत: आंदोलनात सहभाग होणार, असा इशारा त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिलाय. एव्हंढच नाहीतर वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवल्याचा वाद आता थेट सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलाय... विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि मौलिक अधिकारांच्या रक्षणासाठी तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आलीये. दुसरीकडे, सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवल्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय.

सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनाची धग थेट महाराष्ट्रातही पोहोचलीये. दादरमध्ये शिवाजी पार्कमध्ये ठाकरेसेनेकडून वांगचूक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी तरुणांकडून आंदोलन करण्यात येतंय. सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दिल्लीकडे निघालेत. मात्र 20 जुलैच्या संसदेवरील मोर्च्यासाठी सीजेपीने अद्याप परवानगी मागितलेली नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. दरम्यान संसदेत सोमवारपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधक मोदी सरकारला धारेवर धरणार हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT