Viral Snake Video
Viral Snake Video Saam TV
देश विदेश

Viral Snake Video: महिलेने टॉयलेटसीट उघडताच दिसला साप; पुढे जे घडलं ते भयानकचं

Ruchika Jadhav

Viral Snake Video: तुम्ही वॉशरुमला गेला आहात,आत गेल्यावर दरवाजा बंद केला आणि वॉशरुममध्ये साप दिसला तर? निश्चितच असं दृश्य पाहून सगळ्यांचा थरकाप उडेल आणि यावेळी वाटणारी भीती शब्दात मांडणे अशक्य आहे. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये अशी एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Latest viral snake video)

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या मोठ्या प्राणावर उष्ण तापमान आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आणि प्राणी देखील थंड जागेचा आधार घेत असतात. ऑस्ट्रेलियाच्या हर्वे बे या ठिकाणी एका महिलेच्या घरात असलेल्या वॉशरुममध्ये एक साप सापडला आहे. महिला वॉशरुममध्ये गेली आणि तिने टॉयलेटसीट उघडल्यावर त्याला एक साप जखडलेला दिसला. हे दृश्य पाहून महिला खूप घाबरुन गेली. काय करावे काय नाही हे तिला समजत नव्हते.

त्यानंतर महिलेने काही सर्पमित्रांशी संपर्क केला. यावेळी सापाला कोणतीही इजा न पोहचवता त्याला पकडण्यात आले. तसेच निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. ऑस्ट्रेलियामध्ये सध्या उष्णतेची लाट आली आहे. माणसाला देखील या उष्णतेचा खूप त्रास होत आहे. असाच त्रास सापाला देखील होत असणार त्यामुळेच त्याने स्वत:ला थंड ठेवण्यासाठी थेट वॉशरुम गाठले, असं काही व्यक्ती म्हणत आहेत.

सापाचा हा व्हिडिओ पाहून काही नेटकरी हसत आहेत. तर काहींनी यावर प्रतिक्रिया देत भीती व्यक्त केली आहे. कारण हा साप उघड्या डोळ्यांनी पटकन पाहता येईल अशा ठिकाणी नव्हाता. साप टॉयलेटसीटजवळ बसला होता. त्यामुळे जर पटकन त्याच्याकडे लक्ष गेले नसते तर जे घडले असते ते विचार आणि कल्पनेच्याही पलिकडले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Roti At Night: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

Eknath Shinde News| एकनाथ शिंदे,श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या बंद दाराआड चर्चा!

Today's Marathi News Live: या वर्षी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटही कडू; ४ विकेट राखून हैदराबादचा विजय,Points Table मध्ये राजस्थानची घसरण

SCROLL FOR NEXT