Slovakia Prime Minister Robert Fico 
देश विदेश

Slovakia PM: स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर गोळीबार; प्रकृती गंभीर

Slovakia Prime Minister Robert Fico: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्याप्रमाणेच स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांवरही गोळ्या झाडण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधानांची प्रकृती गंभीर आहे.

Bharat Jadhav

स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. मंत्रिमंडळ बैठकीनंतर जनतेला संबोधित करत असताना त्यांच्यावर हल्ला झालाय. हल्लेखोराने पंतप्रधानांना मारण्यासाठी अनेक राऊंड गोळीबार केला. या गोळीबारात पंतप्रधान रॉबर्ट फिको जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्याप्रमाणेच स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांवर गोळी झाडण्यात आलीय. या गोळाबारात रॉबर्ट फिको जखमी झाले असून त्यांच्याबाबत अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाहीये. हल्लेखोर एक होता की एकापेक्षा जास्त होते त्यांची माहितीही मिळालेली नाहीये. परंतु पंतप्रधानांवर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे वय ७१ असल्याचे सांगण्यात येत आहे.

रॉबर्ट फिको यांना दोन गोळ्या लागल्या आहेत. एक गोळी छातीत तर दुसरी पोटात लागल्याचं माहिती हाती आलीय. दरम्यान सुरक्षा दलाने हल्लेखोराला अटक केलीय. हा हल्ला का करण्यात आला हे सध्या स्पष्ट झालेले नाही. हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी पंतप्रधानांना रुग्णालयात नेले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

दुसरीकडे सुरक्षा दलाकडून आरोपीची चौकशी करण्यात येत आहे. स्लोव्हाकिया हा पूर्व युरोपमधील एक देश आहे. या देशाच्या चारही बाजूंना भूभागाची सीमा लाभलीय. हा असा देश आहे ज्याच्या सीमेला समुद्रकिनारा लाभलेला नाहीये. या देशाचे क्षेत्रफळ अंदाजे ५० हजार चौरस किलोमीटर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-Pakistan Cricket: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही? क्रीडा मंत्रालयानं स्पष्टचं सांगितलं

Maharashtra Live News Update: तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस गळती

Voter Duplication: सत्ताधारी आमदाराच्या पत्नीचं मतदार यादीत दोनदा नाव|VIDEO

Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशभक्तांना टोलमाफी; पास कसा आणि कुठे मिळणार?

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज, मेट्रो प्रवास करत घ्या बाप्पाचं दर्शन; गणेशोत्सवानिमित्त नवं वेळापत्रक जारी

SCROLL FOR NEXT