देश विदेश

Sleeping In Office: ऑफिसमध्ये बिनधास्त घ्या डुलकी, कोणताही गुन्हा नाही

Karnataka High Court: कामाच्या ताण किंवा कमी झोपेमुळे ऑफिसमध्ये डुलकी लागणं स्वाभाविक आहे. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये डुलकी घेणं भितीदायक वाटतं, कारण त्यांना नोकरीची चिंता असू शकते.

Dhanshri Shintre

काही वेळा कामाच्या ताणामुळे किंवा कमी झोपेमुळे ऑफिसमध्ये डुलकी लागणे स्वाभाविक आहे. परंतू अनेक कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये डुलकी घेण्याची भीती वाटते. त्यांना भीती असते की, बॉस त्यांना डुलकी घेताना पाहून कामावरुन काढून टाकेल. अशा भीतीने ऑफिसमध्ये कर्मचारी त्रस्त असतात. तु्म्हाला पण ऑफिसमध्ये डुलकी घेण्याची भीती वाटत का? याबाबत कर्नाटकामधील हायकोर्टाने नुकताच एक महत्त्वपूर्ण अपडेट निर्णय दिला आहे.

नेमकं काय घडलं?

कर्नाटकामधील एका कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. एक कॉन्स्टेबल चंद्रशेखर काम करत असताना डुलकी घेत असल्यामुळे त्यानंतर त्याला नोकरीवरुन निलंबित करण्यात आले. यावर कॉन्स्टेबलने हायकोर्टात याचिका दाखल केली. न्यायाधीशांनी सुनावणी करताना संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला आराम आणि झोप घेण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की कामाच्या ठिकाणी झोप लागणे हा गुन्हा नाही. याचिकाकर्त्याला निलंबित करणे योग्य नाही असं न्यायालयाने म्हटलं.

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळातील ट्रान्सपोर्ट कॉन्स्टेबल चंद्रशेखरला सलग दोन महिने १६ तास शिफ्ट करत असताना १० मिनिटांची डुलकी घेतल्यावर निलंबित करण्यात आले. यावर त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली ज्यात त्याने निलंबनाचे कारण स्पष्ट केले. हायकोर्टाने केकेआरटीसीचा निलंबन आदेश रद्द करत राज्य परिवहन प्रशासनाला फटकारले. कोर्टाने सांगितले की कॉन्स्टेबलला विना ब्रेक काम देणे प्रशासनाची चूक होती आणि त्याला योग्य विश्रांती मिळण्याची आवश्यकता होती.

चंद्रशेखरला कामाच्या ताणामुळे दोन शिफ्टमध्ये काम करावं लागत होतं जो कायद्यानुसार योग्य नाही. कायद्यानुसार एका दिवसात ८ तासांपेक्षा जास्त काम आणि आठवड्यात ४८ तासांपेक्षा अधिक काम करणं प्रतिबंधित आहे. मानवाधिकाराच्या कलम २४ मध्ये आराम आणि सुट्टी घेण्याचा अधिकार स्पष्टपणे दिला आहे ज्यात योग्य कामाचे तास, पगार आणि सुट्टीचा समावेश आहे. काही परिस्थितींमध्ये या नियमांना अपवाद लागू शकतो, परंतु चंद्रशेखरला अत्यधिक काम करणं बंधनकारक ठरलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT