Delhi News  Saam Tv
देश विदेश

Delhi News : थंडीपासून बचावासाठी शेकोटी पेटवली; पती-पत्नी २ मुलांसह सहा जणांचा मृत्यू

Delhi Family Died : पहिल्या घटनेत एका कुटुंबाने स्वतःला थंडीपासून वाचवण्यासाठी घरात चुल पेटवली होती. चूल सुरु ठेवून हे कुटुंब झोपी गेलं होते.

प्रविण वाकचौरे

Delhi News :

दिल्लीतील थंडी जीवघेणी ठरत आहे. थंडीमुळे दोन घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. तर दुसर्‍या एका ठिकाणी दोन जणांचा थंडीने मृत्यू झाला आहे.

पहिल्या घटनेत एका कुटुंबाने स्वतःला थंडीपासून वाचवण्यासाठी घरात चुल पेटवली होती. चूल सुरु ठेवून हे कुटुंब झोपी गेलं होते. दरम्यान चूल सुरु असल्याने खोलीत सर्वत्र धूर पसरला. या धुरामुळे कुटुंबातील चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. दिल्लीतील खेडा भागात ही घटना घडली आहे.

पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दोन मुलांपैकी एकाचे वय ७ वर्षे आणि दुसऱ्याचे ८ वर्षे आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, शेकोटी पेटवण्यासाठी त्यांनी कोळसा किंवा लाकडाचा वापर केला होता. कोळसा आणि लाकूड जाळल्याने कार्बन मोनोऑक्साइड बाहेर पडतो. याशिवाय अनेक विषारी वायू बाहेर पडतात. बंद खोलीत कार्बन मोनॉक्साईड वाढते आणि त्याचा मेंदूवर परिणाम होतो. ऑक्सिजन कमी झाल्यामुळे गुदमरल्यासारखे होते, ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. हीच परिस्थिती या कुटुंबासोबत झाली असावी.  (latest Weather update)

दुसरीकडे, इंद्रपुरीमध्ये शेकोटी पेटवून झोपलेल्या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. दोघेही बेशुद्ध अवस्थेत सापडले, मात्र त्यांना वाचवता आले नाही. मृतांपैकी एकाचे वय 56 तर दुसऱ्याचे वय 22 वर्ष होते. दोघेही मूळचे नेपाळी आहेत. पोलिसांनी सहाही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT