accident Saam TV Marathi News
देश विदेश

Accident : गंगेत स्नान करून येताना काळाचा घाला, ६ जणांचा जागीच मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

Devotees returning from Ganga die in accident : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. गंगा स्नान करून परत येताना एर्टिगा कारला ट्रकची जोरदार धडक बसून कारचा चक्काचूर झाला. दोन जण गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

Uttar Pradesh Barabanki highway crash news : उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. बाराबंकीमधील देवा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोमवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. एर्टिगा कार आणि वेगात असलेल्या ट्रकची समोरासमोर जोरात धडक झाली. हा अपघात इतकी भीषण होता की सहा जणांचा जागीच मृत्यू झाल. महागड्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघातामधील जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्यात येत आहे. पोलिसांकडू याप्रकरणी नोंद करण्यात आली असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एर्टिगामधील प्रवासी बिथूर येथून गंगा नंदीत अंघोळ करून घराकडे परत येत होते. त्यावेली बाराबंकीमधील देवा पोलिस स्टेशन परिसरातील कुटलूपूर गावाजवळ सोमवारी रात्री उशिरा अपघाताची ही भयानक दुर्घटना घडली. नोंदणी नसलेल्या एर्टिगा कारला दिशेने येणाऱ्या एका भरधाव ट्रकने जोरात धडक दिल्याचे वृत्त आहे. धडक इतकी जोरदार होती की एर्टिगाचा चक्काचूर झाला आहे. एर्टिगामधील सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. एर्टिगाची नोंदणी नव्हती, नंबर प्लेट नव्हता. ही कार नवीकोरी असेल असा अंदाज वर्तवला जातोय.

एर्टिगा आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की आजूबाजूला आवाज ऐकू गेला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी याबाबत माहिती दिली. देवा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते, ट्रक वेगाने जात होता आणि नियंत्रणाबाहेर जाऊन एर्टिगा कारला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झालाय. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून पुढील तपास केला जात आहे.

अपघातामधील मृतांपैकी एकाचीही ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींमध्ये प्रदीप सोनी यांचा मुलगा नैमिश आणि एका अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे. कानपूरमधील बिथूर येथे गंगा नदीत आंघोळ करून एर्टिगामधील सर्व प्रवासी घराकडे परत येत होते. त्यावेळी काळाने घाला घातला. समोरून येणाऱ्या ट्रकने एर्टिगाला जोरात धडक दिली. यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात कोणते उद्योगधंदे भरभराटीस होते?

Double Decker Flyover: वर मेट्रो अन् खाली उड्डाणपूल; नवी मुंबई ते भिंवडीचा प्रवास होणार सुसाट; कल्याण-डोंबिवलीमधून जाणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! इस्लामपूर नव्हे, आता ईश्वरपूर

MHADA Lottery: पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, वाकड अन् हिंजवडीत घ्या फक्त २८ लाखांत घर; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Bridal Makeup Tips: यावर्षी लग्न ठरलयं? मग 'पिक्चर-परफेक्ट' ब्राईडल लुकसाठी या ७ टिप्स नक्की करा फॉलो

SCROLL FOR NEXT