Godavari River Six Children Drown Saam Tv News
देश विदेश

Godavari River : तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीत ६ चिमुकले बुडाले, नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश

Godavari River Six Children Drown : महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवरील मेडिगड्डा धरणाजवळून गोदावरी नदी वाहते. या नदीच्या पलीकडे तेलंगणाच्या हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ असलेल्या नदीच्या पात्रात आंघोळीसाठी सहा मुले गेली होती.

Prashant Patil

गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणाच्या हद्दीतील मेडीगड्डा धरणाजवळ गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी उतरलेली सहा मुले बुडाली. ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. सहाही मुले तेलंगणाची असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.

महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवरील मेडिगड्डा धरणाजवळून गोदावरी नदी वाहते. या नदीच्या पलीकडे तेलंगणाच्या हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ असलेल्या नदीच्या पात्रात आंघोळीसाठी सहा मुले गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. तेलंगणा पोलिस घटनास्थळी पोहोचले असून रात्री उशिरापर्यंत मच्छीमारांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आहे. तेलंगणातील वरिष्ठ मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी या घटनेची माहिती घेतली.

बुडालेल्या मुलांची नावं

पत्ती मधुसूदन (१५), पत्ती मनोज (१३), कर्नाळा सागर (१४), तोगरी रक्षित (११, चौघे रा. आंबटपल्ली, तेलंगणा), पांडू (१८) व राहुल (१९, दोघे रा. कोरलाकुंडा, तेलंगणा) यांचा समावेश आहे.

नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश

या घटनेनंतर मुलांच्या नातेवाईक व कुटुंबीयांनी गोदावरी नदीकाठी गर्दी केली.महाकाय पात्रात बुडालेली ही मुले सुखरुप परत यावीत यासाठी देवाचा धावा करत काळीज पिळवटणारा आक्रोश केला, त्यामुळे परिसर सुन्न झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

SCROLL FOR NEXT