Turkey Earthquake Update Twitter/@ANI
देश विदेश

Turkey-Syria Earthquake : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये परिस्थिती गंभीर, भूकंपामुळे आतापर्यंत 24,680 लोकांचा मृत्यू

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठा हाहाकार माजला आहे. भूकंपामुळे आतापर्यंत 24,680 लोकांचा मृत्यू तर 85 हजारांहून अधिक जखमी झाले आहेत.

वृत्तसंस्था

Turkey-Syria Earthquake Update : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठा हाहाकार माजला आहे. ६ फ्रेबुवारी रोजी झालेल्या भूकंपामुळे जमिनीवर मृतदेहांचे खचच्या खच पडले आहेत. या भीषण आपत्तीतील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. ढिगाऱ्यांचे ढिगारे पसरले असून सर्वत्र आरडाओरडा व शोककळा पसरली आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आतापर्यंत मृतांची संख्या 24 हजारांच्या पुढे गेली आहे.

मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. लाखो नागरिक बेघर झाल्याने जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) भारतासह जगभरातील बचावकर्ते भूकंपग्रस्तांना मदत करण्यात गुंतले आहेत. अजूनही ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.  (Latest Marathi News)

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे परिस्थिती गंभीर आहे. जीव गमावणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. नवीन आकडेवारीनुसार, आतापर्यंत 24 हजार 680 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 85 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी तात्पुरती स्मशानभूमी करून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली जात आहे.

सीरियात किती लोकांचा मृत्यू झाला?

त्याच वेळी, सीरियामध्ये 4,467 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि 5 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. अशा परिस्थितीत मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत मृतांची आणि जखमींची आकडेवारी

• एकूण मृत्यू- 24,680

• एकूण जखमी - 85,349

• तुर्की - 20,213 मृत्यू

• तुर्की - 80,052 जखमी

• सीरिया - 4,467 ठार

• सीरिया - 5,297 जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT