siddaramaiah-and-shivakumar Saam TV
देश विदेश

Karnataka Next CM : कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी

Karnataka Next CM : कर्नाटकातील विजयानंतर मुख्यमंत्र्याच्या नावाबाबत रस्सीखेच सुरु आहे.

साम टिव्ही ब्युरो

Karnataka Next CM : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठी मुसंडी मारली. कर्नाटकात काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. पण कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल? याचा निर्णय घेणे काँग्रेसला काहीसं कठीण जाणार आहे.

कर्नाटकातील विजयानंतर मुख्यमंत्र्याच्या नावाबाबत रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा करण्यासाठी आज विधिमंडळ पक्षाची बैठकही बोलावण्यात आली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत.सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे आणि पुढील मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री निवडीसाठी समितीची स्थापना

कर्नाटकच्या मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्यमंत्री नेमण्यासाठी एक समिती तयार केली आहे.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पक्षाचे नेते जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांची कर्नाटकातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (CLP) नेत्याची निवड करण्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

सिद्धरामय्या यांचं पारडं जड

काँग्रेसने डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवल्यास केंद्रीय एजन्सीद्वारे शिवकुमार यांच्यावर कारवाईचं हत्यार उपसलं जाऊ शकतं. यामुळे सरकारच्या अडचणी वाढू शकतात. अशा परिस्थितीत सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदी बसवणे काँग्रेसला सोईचं ठरू शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT