Shraddha Walker Aftab Case SAAM TV
देश विदेश

Shraddha Walkar Case : आफताबने श्रद्धाचा मोबाईल कुठे फेकला? पोलिसांना लोकेशन समजलं; पण...

आफताबने श्रद्धाचा मोबाईल कुठे फेकला? याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Satish Daud

Shraddha Walkar Murder Case :  श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. मूळची वसईची रहिवासी असलेल्या २६ वर्षांच्या श्रद्धाची तिचा प्रियकरआफताब पुनावालानं दिल्लीत हत्या केली. श्रद्धा-आफताब दिल्लीत लिव्ह इनमध्ये राहत होते. जवळपास सहा महिन्यांनी श्रद्धाच्या हत्येचा उलगडा झाला. सध्या पोलीस आफताबची कसून चौकशी करीत आहेत. दरम्यान, आफताबने श्रद्धाचा मोबाईल कुठे फेकला? याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. (Latest Marathi News)

स्वत: आरोपी आफताब याने ही (Crime News) माहिती पोलिसांना दिली आहे. श्रद्धा वालकर हिचा मोबाईल आपण भाईंदरच्या खाडीत फेकला असल्याची कबूली आफताबने दिली. याबाबत दिल्ली पोलीस मुंबईतील भाईंदर खाडीत मोबाईलच्या शोधासाठी आली आहे. दरम्यान त्या दृष्टीने त्यांनी दोन बोटींच्या साहाय्याने तपास सुरू केला आहे.

जर आफताबने श्रद्धाचा मोबाईल समुद्रात फेकला असेल, तर त्याचा शोध घेणं पोलिसांना (Police) मोठं आव्हान असणार आहे. दोन बोटींच्या साहाय्याने एका बोटीवर 10 लोकांचं पथक त्यात 2 मरीन ड्रायव्हर, 3 स्थानिक चालक दिल्ली पोलीस, व माणिकपूर पोलिसांच पथकाचे सर्च ऑपरेशन सुरु आहे.

आरोपी आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आफताबनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचं आव्हान दिल्ली पोलिसांसमोर आहे.

किचनमध्ये जाळला श्रद्धाचा फोटो

आफताबने सांगितले की, त्याला श्रद्धाशी संबंधित प्रत्येक पुरावा त्याला नष्ट करायचा होता, त्यासाठी त्याने २३ मे रोजी घरात असलेले श्रद्धाचे सामान एका पिशवीत भरले होते. ही बॅगही पोलिसांनी घरातून जप्त केली आहे. ज्यामध्ये श्रद्धाचे कपडे आणि शूज होते. याशिवाय, किचनमध्ये आफताबने तीन फोटो जळाले होते.

आफताब श्रद्धाचा तिरस्कार करू लागला होता

आफताब श्रद्धाचा इतका तिरस्कार करु लागला की, त्याने गांजा पिऊन फक्त तिची हत्याच केली नाही. तर त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि नंतर अशा ठिकाणी फेकून दिली जेथून पोलीस ते परत मिळवू शकणार नाहीत. एवढेच नाही तर यानंतरही त्याचा द्वेष संपला नाही म्हणून त्याने श्रद्धाचे फोटोही जाळून टाकले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ballaleshwar Temple Pali : नाद करायचा नाय! पूजेचं साहित्य विकणाऱ्या मराठी व्यावसायिकचा दुकानात आलेल्या विदेशी पर्यटकांसोबत थाई भाषेतून संवाद; पर्यटक आवाक

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची पत्रकार परिषद

OBC Reservation : मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार? वकील योगेश केदार यांनी सांगितली अडचण, आता नवी मागणी चर्चेत

Nepal Protest: नेपाळमधील हिंसक आंदोलनाचा उत्तर प्रदेशला फटका; जाणून घ्या काय आहे कारण?

उपसरपंचाच्या डोक्यात गोळी लागली, कारमध्ये आढळला मृतदेह; बीडमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT