Shraddha Walker Case Update
Shraddha Walker Case Update SAAM TV
देश विदेश

Shraddha Walker Case : घटनेबद्दल आठवणे कठीण झालंय, कोर्टात कबुली देतानाच आफताब काय काय म्हणाला? वाचा

Nandkumar Joshi

Shraddha Walker Case Update : श्रद्धा वालकर प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आज, मंगळवारी सुनावणीवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आफताबला कोर्टासमोर हजर करण्यात आले. जे घडलं ते रागाच्या भरात, अशी कबुली आफताबनं न्यायाधीशांसमोर दिली.

दिल्लीच्या साकेत कोर्टात आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. त्यावेळी त्याने कबुली दिली. मी जे काही केलं ते रागाच्या भरात केलं, असं आफताब म्हणाल्याचं सांगण्यात येत आहे. आफताबच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टानं त्याचा जबाब रेकॉर्डवर घेतला नाही. रिपोर्टनुसार, पॉलिग्राफ टेस्टकरिता आफताबनंही तयारी दर्शवली आहे. त्यानंतर कोर्टानं या चाचणीला मंजुरी दिली आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, आफताबची एकूण १४ दिवसांची कोठडी झाली आहे. याआधी दोनदा पाच पाच दिवसांची कोठडी घेतली आहे. तर आज, मंगळवारी कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आता या कालावधीत त्याची पॉलिग्राफी टेस्ट होईल. त्यानंतर नार्को चाचणी होणार आहे. आता या दरम्यान या गुन्ह्याची उकल करणे आणि ठोस पुरावे गोळा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

आफताबनं कोर्टात सांगितलं की, पोलीस (Police) चौकशीवेळी मॅप तयार करून कुठे कुठे श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकले आहेत, याची माहिती दिली होती. एका तलावाजवळ श्रद्धाचं शीर फेकलं होतं. मात्र, बरेच महिने उलटून गेल्याने नेमक्या ठिकाणाबद्दल आठवत नाही. दुसरीकडे आफताबनं नकाशात एका तलावाचा उल्लेख केला होता. दिल्ली पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा हत्या प्रकरणाच्या तपासासाठी १४ वेगवेगळ्या टीम तयार केल्या आहेत. या सर्व टीम पुराव्यांचा शोध घेणार आहेत. ठिकाणांच्या आधारे शोध घेतला जाईल. महरौली, गुरुग्रामजवळच्या जंगल परिसरात कचरा वेचणाऱ्यांकडूनही माहिती घेतली जाईल.

तिसऱ्यांदा पोलीस कोठडी

दरम्यान, सोमवारी आफताबच्या वकिलांनी सांगितले की, दोन दिवसांपेक्षा अधिकची पोलीस कोठडी वाढवण्यास विरोध दर्शवला जाईल. यापूर्वी पोलिसांनी आफताबची पाच-पाच दिवसांची कोठडी घेतली आहे. आता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आता आफताबची पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट होणार आहे. दिल्ली पोलिसांनी आफताबच्या पॉलिग्राफ टेस्टसाठी कोर्टात सोमवारी अर्ज दाखल केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Today's Marathi News Live : नाशिक लोकसभा मतदारसंघातून अनिल जाधव भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

SCROLL FOR NEXT