Shraddha Walker Case Update SAAM TV
देश विदेश

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा प्रकरणात आणखी नवे खुलासे होणार?आफताबची आज नार्को टेस्ट

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं.

वृत्तसंस्था

Shraddha Walkar Case : दिल्लीतील (Delhi) श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. आरोपी आफताबने आपली प्रेयसी श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. सध्या पोलीस आरोपी आफताबची चौकशी करत आहेत. आज या हत्याकांडाबाबत मोठे खुलासे होऊ शकतात. कारण, दिल्ली पोलीस (Delhi Police)आज आरोपी आफताब पूनावला याची नार्को टेस्ट करणार आहे.

यापूर्वी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली होती, ज्यामध्ये त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीही स्थापन केली आहे. दुसरीकडे, आफताबचे वक्तव्य आणि आतापर्यंत केलेल्या तपासाच्या आधारे छतरपूर आणि गुरुग्रामच्या जंगलात पुन्हा शोधमोहीम राबवली जाईल, जेणेकरून मृतदेहाचे तुकडे किंवा इतर पुरावे मिळू शकतील.

पॉलीग्राफ चाचणीत गुन्हा काबुल

श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांचा (Delhi Police) तपास वेगाने सुरू आहे. याप्रकरणी आरोपी आफताब पूनावालाची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली आहे. ही चाचणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आफताबने (Aftab Poonawala) श्रद्धाची हत्या केल्याचं कबुल केलं आहे. तसेच त्याने श्रद्धाला मारण्याचा प्लान आधीच केला होता असे देखील त्याने सांगितले आहे. तसंच त्याला तिची हत्या केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं त्याने या पॉलिग्राफ टेस्ट दरम्यान सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

पॉलीग्राफ चाचणी दरम्यान आफताबला अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याने श्रध्दाच्या मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकून दिल्याचेही काबुल केले आहे. इतकंच नाही तर आफताबने इतरही अनेक मुलींशी संबंध असल्याचं सांगितलं.यादरम्यान आफताबने असेही सांगितले की, त्याने या हत्येशी संबंधित सर्व गोष्टी पोलिसांना सांगितल्या आहेत.

'श्रद्धाच्या हत्येचा पश्चाताप नाही'

थक्क करणारी बाब म्हणजे श्रद्धा वालकर हिची हत्या केल्यानंतर आरोपी आफताबने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. हे तुकडे त्याने काही दिवस फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर ठराविक अंतराने त्याने तुकड्यांची विल्हेवाट लावली. पोलिसांत त्याने हत्येची कबूली दिली असली तरी, त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चापात दिसत नाहीये. श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही, असं देखील त्याने म्हटलं असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न

आरोपी आफताब पुनावाला याच्यावर दिल्लीत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेलं जात होतं. त्यावेळी हा तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्ला करणाऱ्या दोघांनी ते हिंदू सेनेचे सदस्य असल्याचं सांगितलं आहे. आफताबला तुरुंगात नेत असताना झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांची मोठी तारांबळ झाली. आता आफताबची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आरोपी आफताबची येत्या १ डिसेंबरला नार्को टेस्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

SCROLL FOR NEXT