Shraddha case  Saam TV
देश विदेश

Shraddha Walkar Case: श्रद्धाची शेवटची चॅटिंग आली समोर, मित्राला 'ती' बातमी सांगायची राहूनच गेली

. आतापर्यंत समोर आलेल्या चॅट्सपैकी हे श्रद्धाचे सर्वात शेवटचे चॅट आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : श्रद्धा वालकरच्या हत्येच्या पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता श्रद्धा वालकरचं मृत्यूपूर्वीचं शेवटचे चॅट समोर आलं आहे. हत्येच्या काही तास आधी तिने केलेली चॅटिंग पोलिसांच्या हाती लागली आहे. मला एक बातमी मिळाली आहे, असं श्रद्धाने आपल्या चॅटिंगमध्ये मित्राला सांगितलं होतं.

श्रद्धा वालकरने 18 मे रोजी हत्येच्या काही तास आधी सायंकाळी सुमारे साडेचार वाजता तिच्या मित्राला मेसेज केला. आतापर्यंत समोर आलेल्या चॅट्सपैकी हे श्रद्धाचे सर्वात शेवटचे चॅट आहे. यात श्रद्धाने मित्राला लिहिले आहे की 'मला बातमी मिळाली आहे. मी खूप व्यस्त आहे. (Latest Marathi News)

मित्राने श्रद्धाला विचारले की कोणत्या बातमीबद्दल बोलत आहे, तेव्हा श्रद्धाने याला कोणतेही उत्तर दिले नाही. श्रद्धा आणि आफताबच्या मित्रासोबतचं हे चॅट आहे. त्यानंतर काही दिवसांनी त्या मित्राने पुन्हा एकदा तू कुठे आहेस हे विचारण्यासाठी मेसेज केले होते. (Crime News) 

श्रद्धाच्या मृत्यूनंतर 4 महिन्यांनी इन्स्टाग्रामवरून आफताबने श्रद्धाच्या मित्राला मेसेज केले होते. 'श्रद्धाला सांग मला कॉल करायला', असं आफताबने म्हटलं होतं. यावरून आफताबला हे दाखवायचे होते की श्रद्धा त्याला सोडून गेली आहे. तसेच तो तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे.

पोलिसांना 2020 मध्ये लिहिलं होतं पत्र

श्रद्धानं महाराष्ट्र पोलिसांना २३ नोव्हेंबर २०२० रोजी पत्र लिहिलं होतं. त्यात तिनं आफताबविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ब्लॅकमेलिंग आणि प्राणघातक हल्ला होण्याची भीती तिनं या पत्रात व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीतील कचरा डेपोला भीषण आग; ११ अग्निशमन गाड्यांकडून आग विझवण्याचे प्रयत्न

Dalimb Benefits: रोज १ वाटी डाळिंब खा; हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT