Shraddha Walkar Case Aftab Poonawala Saam TV
देश विदेश

Shraddha Walkar Case : श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी आफताबच्या अडचणीत वाढ

दिल्लीच्या श्रध्दा वालकर प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे

वृत्तसंस्था

Delhi Shraddha Walker Case Update : देशभरात श्रद्धा वालकर हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. दिल्लीच्या श्रद्धा वालकरचा तिचा प्रियकर आफताब पुनावालाने गळा दाबून खून करत ३५ तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले होते. ज्यानंतर रोज नवनव्या खुलाशाने पोलिसही चक्रावून गेले होते. संपूर्ण देशाला हादरवुन टाकणाऱ्या दिल्लीच्या श्रध्दा वालकर प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

या प्रकरणी दिल्ली पोलीस लवकरच आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) यासाठी आरोपपत्राचा मसुदाही तयार केला आहे. जानेवारीच्या अखेरीस कोणत्याही तारखेला आरोपपत्र दाखल केले जाऊ शकते.

श्रद्धा हत्या प्रकरणाची पोलिसांनी ३ हजार पानांचे आरोपपत्र तयार केली आहे. आरोपपत्रात १०० लोकांचे स्टेटमेन्ट घेण्यात आले आहेत. तसंच पुरावे म्हणून इलेक्ट्रॉनिक आणि फॉरेन्सिक विभागाने दिलेले अहवाल जोडले आहेत. ३ हजार पानांचे मसुदा आरोपपत्र अंतिम आरोपपत्राचा मुख्य भाग बनण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी आरोपपत्रात आफताबचा कबूलनामा त्याच्या नार्को टेस्टच्या फॉरेन्सिक रिपोर्टचा अहवाल जोडण्यात आला आहे. या महिन्याच्या शेवटी पोलीस (Police) ही चार्जशीट न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती आहे.

काय आहे श्रद्धा खून प्रकरण?

पोलिसांच्या चौकशीत आफताबनेच श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितले होते. आफताब हा श्रद्धाचा प्रियकर होता. दोघेही मुंबईचे रहिवासी असून काही दिवसांपूर्वी ते दिल्लीला शिफ्ट झाले होते. दिल्लीत दोघेही मेहरौली येथे फ्लॅट घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आफताबने सांगितले होते की 18 मे रोजी त्याचे श्रद्धासोबत भांडण झाले. यानंतर त्यांनी श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले. आफताबने हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. तो रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचा तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

SCROLL FOR NEXT