Shraddha Walkar Case Aftab Poonawala Saam TV
देश विदेश

Shraddha Walkar Case : फाशी झाली तरी चालेल, स्वर्गात मला अप्सरा मिळतील, आफताबच्या जबाबाने खळबळ

श्रद्धा हत्या प्रकरणात मला फाशी झाली तरी चालेल, स्वर्गात मला अप्सरा मिळतील, असं धक्कादायक विधान आरोपी आफताबने केलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shraddha Walkar Case Latest Updates : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानं सर्वांनाच हादवून सोडलं आहे. आरोपी आफताबने त्याची प्रेयसी श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. पोलीस चौकशीत त्याने आपला गुन्हा देखील कबूल केला आहे. आफताबला शिक्षा होण्यासाठी पोलीस सबळ पुरावे शोधत आहेत. दरम्यान, नुकतीच आफताबची पॉलिग्राफ चाचणी पार पडली. या चाचणीत त्याने दिलेल्या जबाबामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)

'फाशी तर फाशी.. मला स्वर्गात अप्सरा मिळतील'

आरोपी आफताबने पॉलिग्राफ चाचणीत केलेली काही विधानं ही थक्क करणारी आहे. श्रद्धा हत्या प्रकरणात मला फाशी झाली तरी चालेल, स्वर्गात मला अप्सरा मिळतील, असं धक्कादायक विधान आरोपी आफताबने केलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आफताफच्या या विधानामुळे तो कट्टर मानसिकतेचा आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

एका पोलीस (Police) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब हा डेटिंग अँपवरून हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा. इतकंच नाही तर त्याने श्रद्धासोबतच्या नात्यादरम्यान, २० पेक्षा अधिक हिंदू मुलींसोबत संबंध ठेवले होते, असा जबाब पोलिसांना दिल्याची माहिती आहे.

आरोपी आफताब हा हिंदू मुलींना बंबल अँपवर शोधून आपल्या जाळ्यात अडकवायचा. श्रद्धा वालकरची हत्या (Crime News) केल्यानंतर तो एका मानसशास्त्रज्ञाला आपल्या रूममध्ये घेऊन आला होता. ती तरुणी देखील हिंदूच होती. यावेळी त्याने श्रद्धाची अंगठी भेट देऊन तिला आपल्या जाळ्यात अडकवले, अशी सुद्धा माहिती समोर आली आहे.

'श्रद्धाच्या हत्येचा पश्चाताप नाही'

थक्क करणारी बाब म्हणजे श्रद्धा वालकर हिची हत्या केल्यानंतर आरोपी आफताबने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. हे तुकडे त्याने काही दिवस फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर ठराविक अंतराने त्याने तुकड्यांची विल्हेवाट लावली. पोलिसांत त्याने हत्येची कबूली दिली असली तरी, त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चापात दिसत नाहीये. श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही, असं देखील त्याने म्हटलं असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न

आरोपी आफताब पुनावाला याच्यावर दिल्लीत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेलं जात होतं. त्यावेळी हा तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्ला करणाऱ्या दोघांनी ते हिंदू सेनेचे सदस्य असल्याचं सांगितलं आहे. आफताबला तुरुंगात नेत असताना झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांची मोठी तारांबळ झाली. आता आफताबची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आरोपी आफताबची येत्या १ डिसेंबरला नार्को टेस्ट होणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT