Shocking! खासदार अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोट 
देश विदेश

Shocking! खासदार अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोट

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पश्चिम बंगालच्या (West Bengal) उत्तर 24 परगणा मतदारसंघातून भाजप खासदार अर्जुन सिंह (BJP MP Arjun Singh) यांच्या घराबाहेर बॉम्ब फेकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह पश्चिम बंगाल पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले असून घटनास्थळाची पाहणी सुरु केली. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड (Governor Jagdeep Dhankhad) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब स्फोट चिंताजनक आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितानुसार, पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगनातील भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर काही अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकले. यावेळी अर्जुन सिंह यांचे कुटुंबीय घरातच उपस्थित होते. तथापि, सिंह यांच्या घराबाहेर बॉम्ब फेकण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांच्याघराबाहेरील सीसीटिव्ही फुटेज चेक करत आहेत.

दरम्यान, बैरकपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अर्जुन सिंह यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सोडली आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये सामील झाले. तेव्हापासून ते टीएमसीच्या निशाण्यावर आहेत. यापूर्वी ते तृणमूल काँग्रेसचे 4 वेळा आमदार राहिले होते. नारदा स्टिंग घोटाळ्यातील टीएमसी नेत्यांविरोधात सुरू असलेल्या सीबीआय तपासादरम्यान, मे महिन्यामध्ये पश्चिम बंगालच्या सीआयडीने खासदारविरोधात चौकशी सुरू करून नोटीस पाठवली. याआधी 2020 मध्ये पोलिसांनी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील भाटपुरा येथील त्यांच्या घरावर छापा टाकला होता. हे प्रकरण स्थानिक सहकारी बँकेशी संबंधित अनियमिततेशी संबंधित आहे. अर्जुन सिंह 2018 मध्ये सहकारी बँकेचे अध्यक्ष होते.

धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वी मार्च महिन्यात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळीही अनेक खासदारांच्या घरावर अनेक बॉम्ब फेकण्यात आले होते. त्यावेळी या स्फोटांमध्ये 3 लोक जखमी झाले. यामध्ये एक मूल, एक तरुण आणि एक वृद्ध महिला यांचा समावेश होता. त्यानंतर, काही अज्ञातांनी वेगवेगळ्या ठिकाणी 15 बॉम्ब फेकल्याचा आरोप काही खासदारांनी केला होता.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT