Uttar Pradesh Hamirpur Missing Girl Found Alive saam tv
देश विदेश

Shocking News : आठवडाभरापूर्वीच वडिलांनी अंत्यसंस्कार केले, तीच मुलगी जिवंत सापडली

Uttar Pradesh Hamirpur News : उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये विचित्र घटना उघडकीस आली. मृत मुलगी आपलीच असल्याचे समजून वडिलांनी आठवडाभरापूर्वी अंत्यसंस्कार केले. तीच मुलगी जिवंत सापडली.

Nandkumar Joshi

Kanpur : १७ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. घरात प्रचंड तणाव होता. कुटुंबीयांनी शोधाशोध केली. पण कुठेच सापडली नाही. त्याचवेळी पोलिसांना एका अज्ञात मुलीचा मृतदेह आढळून आला. तिची ओळख न पटल्यानं पोलिसांनी तो शवागारात ठेवला. दुसऱ्या दिवशीच मलखान प्रजापती हे तिथे पोहोचले. त्यांनी हा मृतदेह आपल्याच मुलीचा आहे, असं सांगितलं. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी तो मृतदेह प्रजापतींच्या ताब्यात दिला. त्यांनी अंत्यसंस्कारही केले. अख्खं कुटुंब दुःखात बुडालं होतं. त्याचवेळी अचानक बेपत्ता मुलगी डोळ्यांसमोर आली. ती जिवंत होती. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, जरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ जून रोजी बुंदेलखंड एक्स्प्रेस वेजवळील विरा गावानजीकच्या सर्व्हिस लेनच्या पुलाखालील पाण्यात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख न पटल्यानं पोलिसांनी तो शवागारात ठेवला होता. पोलिसांनी दिवसभर तपास केला. मात्र, पोलिसांना यश मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी मुस्करा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिहुंनी गावातील मलखान प्रजाप्रती हे पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी त्यांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शवागारात नेले. मृत मुलगी ही आपलीच असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी मृतदेह प्रजापती यांच्या ताब्यात दिला. त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले.

प्रजापती यांनी गावातीलच महेश आणि त्यांचा मुलगा मनोज यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. त्याचवेळी या प्रकरणात अचानक ट्विस्ट आला.

जरिया पोलीस ठाण्याचे अधिकारी मयंक चंदेल यांनी सांगितलं की, बिहुंनी गावातील १७ वर्षीय शिवानी हिला गोहांडमधील तिराहामधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिनं कुटुंबीयांची नावं सांगितली. प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. आपल्या मुलीला जिवंत बघून त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. कुटुंबीयांवरील नाराजीतून घरातून निघून गेल्याचे शिवानीने पोलिसांना सांगितले.

जिच्यावर अंत्यसंस्कार केले ती कोण?

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिसांना आढळून आलेला मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचं प्रजापती यांनी चुकून सांगितलं होतं. त्यांची बेपत्ता झालेली मुलगी सापडली आहे. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तसेच तिचा जबाब देखील नोंदवून घेण्यात येणार आहे. आता ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, ती मुलगी कोण आहे असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं! मालेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन

Maharashtra Live Update: मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर

मतदान केलं त्यांनी निधी मागायचा नाही; मंत्री पंकजा मुंडेंची कुणाला तंबी?

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

लास्ट स्टेजमधील कॅन्सर बरा होऊ शकतो का?

SCROLL FOR NEXT