पत्रकार राजीव प्रताप १८ सप्टेंबरपासून बेपत्ता होते.
१० दिवसांनी जोशीदा बॅरेजच्या तलावात त्यांचा मृतदेह सापडला.
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार छाती व पोटाच्या दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात की घातपात याबाबत अद्यापही पोलीस तपास सुरू आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे पत्रकार राजीव प्रताप यांच्या मृत्यूने पत्रकार समुदायाला धक्का बसला. अशातच राजीव प्रताप यांच्या मृत्यूच धक्कदायक कारण समोर आलं आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार पत्रकार राजीव यांचा मृत्यू छाती आणि पोटाच्या अंतर्गत दुखापतींमुळे झाला आहे, असे पोलिसांनी मंगळवारी जाहीर केले. मात्र डॉक्टरांनी सांगितले की अशा जखमा अपघातादरम्यान होतात.
मिळलेल्या माहितीनुसार, राजीव प्रताप १८ सप्टेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता होते. त्यानंतर १० दिवसांनी रविवारी जोशीदा बॅरेजमधील तलावात त्यांचा मृतदेह सापडला. राजीव यांच्या कुटुंबाने आरोप केला आहे की, त्यांच्या काही वृत्तांकनानंतर त्यांना धमक्या येत होत्या. शिवाय राजीव यांचे भाऊ आलोक प्रताप सिंह यांनी दावा केला की, त्यांच्या भावाने जिल्हा रुग्णालयाची वाईट परिस्थिती उघड केली होती. हा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यापासून राजीव यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. राजीवची गर्भवती पत्नी मुस्कानच्या म्हणण्यानुसार, तिने १८ सप्टेंबर रोजी रात्री ११.१५ वाजता तिच्या पतीशी शेवटचे बोलणे केले.
राजीव यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये राजीव यांच्या छाती आणि पोटाच्या अंतर्गत दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. डॉक्टरांच्या मते, अशा जखमा अपघातादरम्यान होतात. उत्तरकाशीच्या पोलिस अधीक्षक सरिता डोवाल म्हणाल्या," १८ सप्टेंबरच्या रात्री उत्तरकाशी बस स्टँडवरील चौहान हॉटेलमध्ये राजीव त्यांच्या मित्रासोबत जेवण केल्यानंतर, मित्राच्या गाडीने उत्तरकाशीहून गंगोरीला निघाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये १८ सप्टेंबर रोजी रात्री ११:३९ वाजता राजीव प्रताप एकटेच गाडी चालवत असल्याचे दिसून आले. त्याच्या दुसऱ्या दिवशी घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर त्यांची कार सापडली. झडती घेतल्यानंतर त्यांच्या कारमधून त्यांच्या चप्पल सापडल्या."
दरम्यान अजूनही पोलीस पत्रकार राजीव यांच्या मृत्यूचे खरं कारण समोर आणू शकले नाहीत. हा अपघात होता की घातपात हे अद्यापही अनुत्तरित आहे. हाती लागलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार राजीव यांच्या मृत्यूमागचं खरं कारण समोर येणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.