Pahalgam Terror Attack Saam tv
देश विदेश

Pahalgam Attack : पाकिस्तानातील हिंदू माजी खासदाराचे दिवस फिरले, आली कुल्फी विकण्याची वेळ; भुट्टोंच्या सरकारमध्ये होता रुबाब

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यात डबाया राम यांचाही समावेश आहे.

Vishal Gangurde

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारतात पाकिस्तानचे अनेक लोक चर्चेत आले आहेत. भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांना स्वगृही जाण्याची इच्छा नाही. त्यातील एक डबाया राम. डबाया राम यांची गोष्ट फार वेगळी आहे. डबाया राम हे पाकिस्तानचे खासदार होते. सध्या ते भारतात कुल्फीची विक्री करून उदारनिर्वाह करत आहे. डबाया राम यांच्या कहाणीने सर्व चकीत झाले आहेत.

पाकिस्तानचे माजी खासदार डबाया राम हे भारताच्या हरियाणात कुल्फी आणि आइस्क्रीम विकून उदारनिर्वाह करत आहेत. पाकिस्तानच्या बेनजीर भुट्टो यांच्या सरकारमध्ये खासदारकी भूषवलेले डबाया राम हे कुटुंबासोबत २००० साली भारतात आले. मागील २५ वर्षांपासून भारतात असलेल्या डबाया राम यांना भारतीय नागरिकत्वाची आशा आहे. पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक लोकांचं आयुष्य चर्चेत आलं आहे.

पाकिस्तान ते भारतापर्यंतचा प्रवास

डबाया राम यांनी सांगितलं की, 'पाकिस्तानात हिंदूंची स्थिती बिकट आहे. ते सुरुवातीला एका महिन्यांच्या व्हिसा घेऊन भारतात आले होते. त्यानंतर वेळेनुसार व्हिसा वाढवून घेतला. सुरुवातीला एक वर्ष, पुढे पुन्हा एक वर्ष आणि त्यानंतर ५ वर्षांसाठी व्हिसा वाढवला. डबाया राम यांच्या घरात ३४ सदस्य आहेत. त्यातील ६ जणांना भारताचं नागरिकत्व मिळालं आहे. तर २८ जणांनी भारताचं नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. अनेक जण अर्ज स्वीकारण्याची वाट पाहत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, माजी खासदार डबाया राम आणि त्यांच्या कुटुंबीयांना दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध केला. सरकारने दहशतवाद्यांवर कडक कारवाई केली पाहिजे, असे डबाया राम यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. आता दहशतवाद्यांना घरात घुसून मारण्याची वेळ आली आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे. डबाया राम हे हरियाणातील फतेहाबादमध्ये कुल्फी आणि आईस्क्रिम विक्री करण्याचे काम करत आहेत. स्थानिकांच्या सहकार्यामुळे त्यांचं कुटुंब शांततेत राहत असल्याचा त्यांचा दावा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT