राजकोटमध्ये डॉक्टरचं भयंकर कृत्य
क्लिनिकमध्ये स्पाय कॅमेरा लावून प्रायव्हेट व्हिडीओ केले शूट
३००० हून अधिक प्रायव्हेट व्हिडिओ रेकॉर्ड केले
ब्लॅकमेलसाठी २५ लाखांची मागणी
गुजरातच्या राजकोटमध्ये एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एका डॉक्टरने महिला डॉक्टरच्या एकतर्फी प्रेमातून भयंकर कृत्य केले. त्याने क्लिनिकमध्ये स्पाय कॅमेरा लावला आणि जवळपास ३००० प्रायव्हेट व्हिडीओ तयार करून डॉक्टर आणि त्याच्या गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल केले. आरोपीने त्यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी ५०००० रुपयांची वसुली केली. शेवटी या त्रासाला कंटाळून डॉक्टर आणि त्याच्या गर्लफ्रेंडने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टरसह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून अटकेची कारवाई सुरू आहे.
डीसीपी क्राईम जगदीश बांगरवा यांनी सांगितले की, आरोपी डॉ. कमल नंदा हा बीएचएमएस पदवीधर आहे. त्याने त्याच्या क्लिनिकमधील बल्ब होल्डरमध्ये एक स्पाय कॅमेरा बसवला होता. त्याने कॅमेऱ्यामध्ये एक मेमरी कार्डही लावले होते. रेकॉर्ड केलेले व्हिडिओ मेमरी कार्डवर सेव्ह केले जात होते. जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा हा डॉक्टर ते मेमरी कार्ड बदलून टाकायचा. डॉ. कमल २०२३ पासून स्पाय कॅमेऱ्याचा वापर करून प्रायव्हेट व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचे उघड झाले आहे. तसेच, त्यांनी आतापर्यंत स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने अंदाजे ३,००० ते ४,००० व्हिडिओ तयार केले असल्याचे उघड झाले.
राजकोट शहरातील ४९ वर्षीय प्रसिद्ध डॉक्टरने दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, आरोपी डॉक्टर कमल नंदाने साधू वासवानी रोडवरील त्यांच्या क्लिनिकमध्ये एक स्पाय कॅमेरा लावला होता. आरोपींनी त्यांचे आणि त्यांच्या गर्लफ्रेंडच्या खासगी क्षणांचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर आरोपीने हे व्हिडीओ काही डॉक्टर आणि पत्रकारांना दिले. या व्हिडीओद्वारे आरोपी कमल नंदा डॉक्टर आणि त्याच्या गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल करत होता. आरोपीने त्यांच्याकडे २५ लाखांची मागणी केली होती. त्यांना ५०००० रुपये देण्यात आली होते. आरोपी २०२४ पासून डॉक्टरला त्रास देत होता आणि बदनामी करण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून शेवटी डॉक्टरने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
आरोपी डॉ. कमल नंदाला जेव्हा समजले की त्याच्या आवडत्या महिला डॉक्टरचे दुसऱ्या पुरुष डॉक्टरसोबत अनैतिक संबंध होते. हे सहन न झाल्याने त्याने हे भयंकर कृत्य केले. त्याने थेट क्लिनिकमध्येच स्पाय कॅमेऱ्या लावला. आपल्या आवडत्या महिला डॉक्टर आणि पुरूष डॉक्टरचे प्रायव्हेट व्हिडीओ काढून त्याने ब्लॅकमेल करण्यात सुरूवात केली. त्याने ते व्हिडिओ पत्रकारांना दाखवले. सुरुवातीला पत्रकार आणि त्यांच्या मध्यस्थाने तक्रारदार डॉक्टरकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. या डॉक्टरने आरोपींनी ५०,००० रुपये दिले होते. राजकोट सायबर क्राईम पोलिस स्टेशन सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.