Employee Dies In Factory Thailand News:  Saamtv
देश विदेश

Shocking News: मॅनेजरने सिक लिव्ह नाकारली, नोकरी गमावण्याच्या भितीने कामावर आली अन्.. फॅक्टरीमध्येच तरुणीचा दुर्दैवी मृत्यू!

Employee Dies In Factory Thailand News: अवघी 20 मिनिटे काम केल्यानंतर ती बेशुद्ध झाली. तिला रुग्णालयात नेण्यात आले शस्त्रक्रिया करण्यात आली. दुसऱ्या दिवशी नेक्रोटाइझिंग एन्टरोकोलायटिसमुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Gangappa Pujari

Employee Dies In Factory: ऑफिसमधील कामाच्या प्रेशरमुळे पुण्यातील एका तरुणीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणावरुन संबंधित कंपनीची चौकशी करण्याचीही मागणी केली जात होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. एका फॅक्टरीत काम करणाऱ्या महिलेला मॅनेजरने सिक लिव्ह नाकारल्यामुळे कामावर यावं लागले. मात्र ड्युटीवर असतानाच तिचा मृत्यू झाल्याने खळबळ खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ही संपूर्ण घटना थायलंडमधील आहे. थायलंडच्या समुत प्राकान प्रांतात राहणारी ३० वर्षीय महिला एका इलेक्ट्रॉनिक्स प्लांटमध्ये काम करत होती. ही ३० वर्षीय महिला काही दिवसांपासून आजारी होती. मोठ्या आतड्याला सूज आल्याने त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर 5 ते 9 सप्टेंबरपर्यंत आजारपणाची रजा घेतली होती. याकाळात तिच्यावर उपचारही सुरु होते.

त्यानंतर 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी तिने कंपनीच्या मॅनेजरकडे प्रकृती ठीक नसल्याने आणखी एक दिवस सुट्टी हवी असल्याचे सांगितले. मात्र कंपनी अधिकाऱ्यांकडून तिची सुट्टी नाकारण्यात आली तसेच तिला वैद्यकीय प्रमाणपत्रही मागण्यात आले. सुट्टी मंजूर न झाल्याने महिला तशाच परिस्थितीत 13 सप्टेंबर रोजी कारखान्यात कामावर गेली. मात्र अवघी 20 मिनिटे काम केल्यानंतर ती बेशुद्ध झाली. तिला रुग्णालयात नेण्यात आले शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु दुसऱ्या दिवशी नेक्रोटाइझिंग एन्टरोकोलायटिसमुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, या महिलेने यापूर्वी कधीही सिक लिव्ह न घेतल्याचे तिच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर संबंधित कंपनीनेही फेसबूक पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे. आमच्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे आम्ही दु:खी आहोत आणि या घटनेची चौकशी करणार आहे. या कठीण काळात कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आधार देणे हे आमचे कर्तव्य आहे. तपासात जे काही तथ्य समोर येईल, त्याची सर्वांना माहिती दिली जाईल, असं संबंधित कंपनीने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT