swami avimukteshwaranand saraswati  Saam tv
देश विदेश

स्वामी अविमुक्तेश्वरानंद अडचणीत, आश्रमातील मुलींवरील अत्याचाराचे आरोप; कोर्टाकडून FIR नोंदवण्याचे आदेश

swami avimukteshwaranand saraswati news : स्वामी अविमुक्तेश्वरानंद अडचणीत सापडले आहेत. आश्रमातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Vishal Gangurde

पोक्सो विशेष न्यायालयाकडून एफआयआर नोंदवण्याचे आदेश

स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि त्यांच्या शिष्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश

आशुतोष ब्रह्मचारी यांनी केली होती कोर्टात याचिका दाखल

ज्योतिष पीठाचा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद अडचणीत सापडले. एडीजे अत्याचार आणि पोक्सो विशेष कोर्टाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी त्यांच्यासहित शिष्य स्वामी मुकुंदानंद गिरीच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शाकुंभरी पीठाधीश्वर आशुतोष बह्मचारी महाराजांनी कलम १७४ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यांनी एफआयआर दाखल करून कडक कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणातील दोन अल्पवयीन मुलींचा जबाब व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून कोर्टात नोंदवण्यात आला. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. यामुळे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणखी अडचणीत आले.

कोर्टात याचिका दाखल करणारे आशुतोष ब्रह्मचारी हे श्री कृष्ण जन्मभूमि मुक्ती निर्माण ट्रस्ट आणि शाकुंभरी पीठाधीश्वर आहेत. झुंसी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली होती.

आशुतोष ब्रह्मचारी यांनी केलेल्या आरोपानुसार, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आश्रमातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आशुतोष यांनी एक सीडी देखील कोर्टात सादर केली. त्यानंतर कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आम्हाला कोर्टाकडून न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया आशुतोष यांनी आदेशानंतर दिली. आता आम्ही प्रयागराजहून विद्यामठ वाराणसीपर्यंत पायी सनातन यात्रा काढून सत्य समोर आणू, असं आशुतोष बह्मचारी यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : जोडीदारासोबत वाद टाळा; 5 राशींची पैशांची चणचण मिटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

SCROLL FOR NEXT