Shocking news 6 people died after drinking spurious liquor in haryana yamunanagar Saam TV
देश विदेश

Liquor Death: दारूच्या एका घोटाने घेतला ६ जणांचा जीव; भयानक घटनेनं अख्खं गाव हादरलं, नेमकं काय घडलं?

Yamunanagar Liquor Death: यमुनानगरमध्ये विषारी दारू प्यायल्याने ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Satish Daud

Haryana Yamunanagar Liquor Death

मागील काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात अवैध आणि विषारी दारूची देवाणघेवाण वाढली आहे. विषारी दारूची खुलेआम विक्री होत असल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशीच एक घटना हरियाणातून समोर आली आहे. यमुनानगरमध्ये विषारी दारू प्यायल्याने ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृतांमध्ये एकाच गावातील ४ जणांचा समावेश आहे. रवींद्र कुमार, सुरेश कुमार, सुरेंद्र कुमार, विशाल सरवन आणि मेहर चंद अशी मृतांची नावे आहेत, तर प्रिन्सची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रिन्स आणि विशाल हे दोघे चुलत भाऊ असल्याचे सांगितले जातं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. यमुनानगरचे पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी स्वत: घटनास्थळी धाव घेत सर्व वस्तुस्थितीचा गांभीर्याने तपास केला. या प्रकरणी काही चौकशीही करण्यात आली आहे, मात्र पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत.

यमुनानगर जिल्ह्यातील मांडेबारी आणि पणजेतो गावातील हे प्रकरण आहे. मांडेबारी गावात विषारी दारू पिऊन एकामागून एक ४ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय मांडेबारी शेजारील पणजेतो गावातील माजरी येथेही दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.

गावात बनावट दारू विक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एका ग्रामस्थाने दिलेल्या माहितीनुसार, दारू प्यायल्यानंतर काही लोकांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि त्यांची दृष्टी गेली. काही लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण वाटेत एकाचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं? VIDEO

मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला; तलवार, हॉकी, फायटर पंचने मारहाण, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग

Ajit Pawar Plane Crash: विमानातून उडी मारण्याची धरपड कुणीतरी करत होतं पण....; अपघाताप्रकरणी नवी माहिती आली समोर

Earthquake : भूकंपाने हाहाकार, जमीन थरथरली; लोक घरातून बाहेर पळाले

SCROLL FOR NEXT