देश विदेश

Shocking: मुस्लिम दाजी नको म्हणून भावाने बहिणीच्या बॉयफ्रेंडला संपवले, घरी बोलावून केली हत्या

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये दोन भावांनी बहिणीच्या प्रियकराची हत्या केली. आरोपींनी मुस्लिम व्यक्तीला मेहुणा होण्यापासून रोखण्याचा हेतू व्यक्त केला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, तिसऱ्याचा शोध सुरु आहे.

Dhanshri Shintre

उत्तर प्रदेशची(Uttar Pradesh) राजधानी लखनऊ(Lucknow) येथील लकडमंडी परिसरात प्रेमप्रकरणातून २६ वर्षीय अली अब्बासची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अली आणि प्रजापती समाजातील एका महिलेशी चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु या नात्याला महिला कुटुंबीय आणि विशेषतः तिचे भाऊ हिमालय आणि सौरभ यांनी विरोध दर्शविला. या सामाजिक आणि कौटुंबिक तणावामुळे आरोपींमध्ये अलीविरुद्ध द्वेष निर्माण झाला.

तपासात समोर आले आहे की, आरोपी हिमालय आणि सौरभ यांनी लग्नाची चर्चा करण्याच्या बहाण्याने अलीला त्यांच्या घरी बोलावले. तिथे त्यांनी पूर्वनियोजितपणे लाठ्या आणि रॉडने अलीवर हल्ला केला. आरोपींनी त्याचे डोके विटेने चिरडून त्याची निर्घृण हत्या केली. घटनास्थळी पोलीस पोहोचण्यापूर्वीच अलीचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी मृतकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी हिमालय आणि सौरभ यांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी सोनू अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथक तयार केले आहेत. या घटनेनंतर लकडमंडी परिसरात तणाव निर्माण झाला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केली आहे.

पश्चिमेकडील पोलिस उपायुक्त(DCP) विश्वजीत श्रीवास्तव यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले असून फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल असे आश्वासन दिले आहे. ही घटना समाजातील प्रेमसंबंधांवरील संकुचित विचारसरणी आणि हिंसाचाराचे दुःखद उदाहरण ठरली आहे, जिथे चार वर्षांच्या प्रेमावर सामाजिक नापसंती आणि कौटुंबिक दबावांनी घातक परिणाम केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio VIP Numbaer: Jio व्हीआयपी नंबर कसा मिळवावा? फॉलो करा ही खास ट्रिक

Beed Rain : गेवराई तालुक्यात ऊस पिकाचे अतोनात नुकसान; मदत वाढवून देण्याची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतूकसाठी बंद, हत्तूर पूल पूर्णतः पाण्याखाली गेला

Cholesterol Control Tips: गोळ्या, औषधं घ्यायची गरजच नाही! ५ उपाय करतील कोलेस्ट्रॉल कमी, तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं?

Kanya Pujan 2025: नवरात्रीच्या आठव्या किंवा नवव्या दिवशी कन्या पूजा का करतात?

SCROLL FOR NEXT